Funny Ukhana Video: सोशल मीडियावर सतत विविध विषयांवरील आधारित हटके मजेशीर व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यात अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे गमतीशीर व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्यूज आणि लाइक्सही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक आजीबाई विनोदी उखाणा घेताना दिसत आहेत. या आजीबाईंनी घेतलेला अशा प्रकारचा हटके उखाणा तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकला नसेल.

लग्नसमारंभ किंवा कोणतेही शुभ कार्य म्हटलं की, विवाहित महिला किंवा पुरुषांना उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उखाणे खूप मोठे, ऐकण्यासारखे आणि हटके असतात. आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही विविध पद्धतीचे उखाणे घेणाऱ्या महिलांचे व्हिडीओ पाहिले असतील. शिवाय गावाकडच्या महिलांचेदेखील विविध उखाणे हल्ली सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. आता एका आजीबाईंचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

हेही वाचा: ‘आई कोणाचीही असो…’ गोठ्यात रडणाऱ्या चिमुकल्याबरोबर गाईनं काय केलं ते पाहाच; VIDEO व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजी गावातल्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असून त्या यावेळी एक विनोदी उखाणा घेताना दिसत आहेत. यावेळी त्या म्हणतात की, “दत्ताच्या देवळात वाजवली घंटी… मालक गेले वरती, मी राहिले खालती” हा उखाणा घेतात. आजीबाईंचा हा उखाणा एकूण अनेक जण लोटपोट झाले आहेत.

हेही वाचा: काय ते एक्स्प्रेशन्स अन् काय ते ठुमके… ‘मैं नाचूँ आज छम छम छम’ गाण्यावर चिमुकलीने धरला ठेका; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anchor_swati1004 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच यावर अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत.दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अनेक भन्नाट उखाणे व्हायरल झाले होते, ज्यावर अनेक व्ह्यूज आणि लाइक्सही मिळाल्या होत्या.