ST Bus Viral Video: वो स्त्री है कुछ भी कर सकती है असं म्हणता ते उगाच नाही. त्यातही मराठमोळ्या महिलांची हुशारी ही काही वेळा चकित करून टाकणारी असते. काही दिवसांपूर्वी अशाच एका मराठी आईने आपल्या बाळाला ट्रेनच्या गर्दीत गरम होऊ नये म्हणून चक्क हुशारीने फॅन आणला होता तर आता एसटीच्या गर्दीतून अशाच डोकेबाजीचा प्रकार समोर येत आहे. तुम्ही आजवर गर्दीच्या ट्रेन- बसमध्ये जागा मिळवण्यासाठी भांडताना पाहिलं असेल. पण या मावशींनी जागा नाही म्हणून टेन्शन घेण्यापेक्षा थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्येच शिरण्याचा प्रताप केला आहे. गंमत म्हणजे असं डोकं लावणाऱ्या या मावशी एकट्याच नव्हत्या त्यामुळे बसचालकाच्या सीटच्या आजूबाजूला सुद्धा तुफान गर्दी झाली होती. मग त्यातही आपल्यासाठी जागा शोधून मावशींनी नेटकऱ्यांना हसावं की रडावं अशा गोंधळात टाकलं आहे.
तुम्ही बघू शकता, गाणगापूर ते कुर्डुवाडी एसटीमध्ये हा प्रकार घडला आहे. व्हिडीओ सुरु होताच तुम्हाला हॉर्नचा मोठ्याने आवाज येईल. बस उभी असतानाही चालक उगाच एवढ्या मोठमोठ्याने सलग हॉर्न का वाजवतोय असा विचार तुमच्याही डोक्यात येईल पण थांबा व्हिडीओ पुढे बघून तुम्हाला तुमचं उत्तरही मिळेल आणि चालकाची, प्रवाशांची दयाही येईल
Video: गच्च भरलेल्या एसटीत मावशी बसल्या हॉर्नवर
हे ही वाचा<< पुणे मेट्रोत बसलेल्या काकांना विचारलं कसं वाटतंय? त्यांचं उत्तर ऐकून म्हणाल, “म्हणून वाट्याला जायचं नाही”
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करून महिलांना अजून बसच्या तिकिटात सवलत द्या असे म्हटले आहे. तर काहींनी अरे आम्हा पुरुषांना पण काहीतरी सवलती द्या अशीही मागणी केली आहे. महिलांना एसटी बसच्या प्रवासात हाफ तिकिटावर म्हणजेच ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवासाची मुभा देण्यात आल्यापासून कधी बसमध्ये तुफान भांडणं तर कधी जागा पकडण्यासाठी बसच्या खिडकीतून आत शिरण्याची कसरत असे अनेक प्रकार घडले होते पण आता या मावशींनी सगळ्यांनाच मागे टाकून हॉर्नवर बसून प्रताप केला आहे.