Maharashtra Assembly Election 2024 : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात आज मतदान पार पडत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्का बजावू शकणार आहेत.प्रत्येकाला आपला विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची महत्त्वाची संधी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेनं उपलब्ध करून दिलीय. त्यामुळे हा आपला सर्वोच्च हक्क बजावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.अशातच मराठी शाळेतल्या एका पाटीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल.

शाळा ही केवळ एक वास्तू नव्हे, ती देशाचं भविष्य असलेल्या बालकांची मानसिक-शारीरिक जडणघडण करणारी एक संस्थाच. मात्र याच मराठी शाळेची आज परिस्थिती सर्वानाच माहिती आहे. आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ असाच काहीसा प्रकार आजकाल पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे मराठी शाळांकडे फिरवली जाणारी पाठ. मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घसरण होत आहे. तुलनेत पालकांचा कल हा इंग्रजी शाळांकडे असल्याचं चित्र आहे. आपण जरी मराठी शाळेकडे पाठ फिरवत असलो तरी मात्र हीच मराठी शाळा आपल्यासाठी कायम उभी असते. प्रत्येक मतदानाला मराठी शाळा मतदानासाठी मतदान बूथ उपल्बध करुन देते. मतदानाच्या कामावेळी प्रत्येकाला मराठी शाळेची आठवण येते. अशाच एका मराठी शाळेतील पाटीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

या मराठी शाळेतल्या फळ्यावर “मतदानासाठी का होईना आमचं मराठी शाळेकडे वळलं पाऊल…सरकार कोणाचे का असेना पण तेथुनच, चालु होऊ दे विकासाचं पहिलं पाऊल” असा मजकूर लिहला आहे. हे वाक्य प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणारं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>अशी वेळ कुणावरच येऊ नये; लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या मृत्यूचा थरार, नेमकं काय घडलं?VIDEO आला समोर

सोशल मीडियावर हा व्हिडीओ dale__________arts_007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “शिक्षणासाठी चांगल्या गुणवत्तेच्या शाळा पाहीजेत, private schools नी पालकांचे कंबरडे मोडत आहे, शिक्षण हा business झाला आहे. तर आणखी एकानं “अगदी बरोबर आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader