Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी क्रिएटिव्हीटी दाखवतो.
सध्या असाच एक क्रिएटिव्हीटी दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शाळा दाखवली आहे. ही शाळा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण या शाळेच्या भिंतीवर लालपरीचे चित्र काढले आहे. एका क्षणासाठी तुम्हाला लालपरीच उभी आहे, असे वाटू शकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (marathi school video showcasing lalpari but its creativity on school wall video goes viral on social media)
लालपरी नव्हे तर शाळा आहे ही!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक एसटी महामंडळाची बस (लालपरी) दिसेल. नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की बस खरोखर नाही तर त्याचे चित्र शाळेच्या भिंतीवर काढले आहे. दुरून पाहिल्यानंतर चक्क बस उभी आहे असं वाटते. शाळा आणि लालपरीचं नातं हे जगावेगळं आहे. दरदिवशी हजारो विद्यार्थी लालपरीने प्रवास करून शाळेत ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी लालपरी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे. हे नांत दर्शवणारं हा व्हिडीओ आहे. या बसवर कोदे ते रंकाळा असं नाव लिहिलेय. बसवर गुणवत्ता एक्सप्रेस असं लिहिलंय. हा व्हिडीओ कोल्हापूर येथील आहे जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video
vk_reacts_daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे चित्र काढायला कळलं तो किती हुशार असेल सलाम त्याच्या कलेला” तर एका युजरने लिहिलेय, “सलाम त्या कलाकाराला.. ही शाळा जिल्हा परिषदेची आहे आणि या शाळेमधुन शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी आज शासनाचे अधिकारी,मोठे व्यवसायिक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “लालपरी आणि शाळेचे जवळचे नाते आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कलाकाराचे कौतुक केले आहेत.