Marathi Bride Ukhana Video: लग्न प्रत्येकासाठीच खास असतं. वधू-वरासाठी हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अगदी लहान सहान गोष्टींपासून सगळ्या गोष्टी चालीरीतींनी पार पाडल्या जातात. अशाच चालीरीतींमध्ये उखाण्यालाही खूप महत्त्व दिलं जातं. लग्नानंतर नव्या नवरीला अनेकदा उखाणे घ्यावे लागतात. पण, तिचा पहिलावहिला उखाणा हा सासरी पाऊल ठेवायच्या वेळचा असतो आणि हा उखाणा अगदी वेगळा व्हावा यासाठी आजकाल नवनवे उखाणे घेण्याचा अनेकांचा अट्टहास असतो.

आधीच्या काळात बायका इकडची स्वारी, अहो, अमुकचे बाबा अशा नावांनी आपल्या नवऱ्याला हाक मारायच्या. अलीकडे लग्नाआधीच्या भेटीगाठी आणि मैत्रीमुळे सहसा अनेक मुली नवरोबांना नावानेच हाक मारतात. पण एक अशी संधी असते जेव्हा मात्र अगदी लाजत, मुरडत, आपल्या अहोंचं नाव घेतलं जातं. अर्थात, ही संधी म्हणजे लग्न. आता लग्नसराईला सुरुवात झाली असून अनेक जण उखाण्यांची तयारी करत असतील. अशा वेळी तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कुणाला मस्त उखाणा तयार हवा असल्यास आज आपण पाहणार असलेला व्हिडीओ तुमच्या कामी येईल. या नव्या नवरीने गृहप्रवेशाच्या वेळी घेतलेला उखाणा नेटकऱ्यांच्यासुद्धा पसंतीस उतरत आहे.

Viral video of groom playing benjo in his wedding while wife dancing in baarat video viral
नवरा असावा तर असा! स्वत:च्याच वरातीत नवरदेवाने काय केलं पाहा…, बायकोनेही दिली साथ; VIDEO पाहून कौतुक कराल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”

मराठी नवरीचा भन्नाट उखाणा

नाव घ्या नाव घ्या म्हणून दार अडवतायत नणंदबाई

नाव घ्या नाव घ्या म्हणून दार अडवतायत नणंदबाई

नणंदबाईंचा मान ठेवून खास

नणंदबाईंचा मान ठेवून खास

सुखी संसाराची मनात धरते आस

वेळेच भान ठेवून करा आता घाई

अजिंक्यरावांचं नाव घेते आत येऊ का सासूबाई

सोशल मीडियावर हा उखाणा व्हायरल झाल्यापासून या व्हिडीओला ७.३ मिलियन व्ह्युज आहेत. दीड लाखाहून अधिक लाइक्स असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करून नवरीबाईच्या उखाण्याचे कौतुक केले आहे.

नवरीचा हा व्हिडीओ @.ajinkya. या इन्स्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर उखाणा आहे ताई”. तर दुसऱ्याने “वाह खूप भारी” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असा उखाणा मी पहिल्यांदाच ऐकला.”

दरम्यान, तुमच्याही ओळखीत कुणाचं ‘यंदा कर्तव्य असेल’ आणि त्यांचा सुद्धा उखाण्यांचा अभ्यास चालू असेल तर हा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

Story img Loader