Ukhana funny video: उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा लग्न समारंभात लयबद्ध पद्धतीने आवडीने जोडीदाराचे नाव घेतले जाते यालाच आपण उखाणा म्हणतो. पूर्वी महिला त्यांच्या पतीसाठी उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात.सोशल मीडियावर पुरुष किंवा महिलांचे उखाणे घेतानाचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा महिला विनोदी उखाणा घेताना दिसत आहेत. दरम्यान आता होम मिनिस्टर कार्यक्रमात एका विहिनींनीही जबरदस्त असा उखाणा घेतला आहे. अशा प्रकारचा हटके उखाणा तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकला नसेल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून वहिणींचा उखाणा ऐकून तु्म्हीही पोट धरुन हसाल.
इकडची स्वारी, अहो, अमुकचे बाबा, अशा नावांनी आधी आपल्या नवऱ्याला हाक मारायची पद्धत होती. अलीकडे लग्नाआधीच्या भेटीगाठी आणि मैत्रीमुळे सहसा अनेक मुली नवरोबांना नावानेच हाक मारतात. पण एक अशी संधी असते जेव्हा मात्र अगदी लाजत, मुरडत, आपल्या अहोंचं नाव घेतलं जातं. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने उखाणे घेतात. कधी कोणी उखाण्यातून त्यांची लव्ह स्टोरी सांगतात तर कधी कोणी एखाद्या गोष्टीचे महत्त्व सांगतात. उखाण्यातून अनेकदा महिला त्यांच्या भावना व्यक्त करतात. या वहिणींनीही त्यांच्या नवऱ्यासाठी जबरदस्त असा उखाणा घेतला आहे. हा उखाणा उपस्थित महिलांनाही हसू अनावर झालं आहे. तुम्हीही वहिनींच उखाणा ऐकून पोट धरुन हसाल तसेच त्यांच्या बिनधास्तपणाचं कौतुकही कराल.
आता तुम्ही म्हणाल असा काय घेतलाय उखाणा? तर या वहिणींनी “काचेच्या बशील चिकूची फोड, स्वप्निल रावांची पप्पी लय गोड…”असा उखाणा घेतला आहे. बरं हा उखाणा घेताना या वहिनींनाही हसू आवरत नाहीये. मिश्किल विनोदी असा उखाणा या वहिणींनी घेऊन सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आणलं आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या nitingavali_homeminister अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा उखाणा व्हायरल झाल्यापासून याला लाखो व्ह्यूज आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.