लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते.
तसेच सोशल मीडियावर अनेकदा अशा नवीन लग्न झालेल्या जोडीदारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात उखाण्याचे व्हिडीओ जास्त प्रमाणात पाहिले जातात. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील नव्या नवरीचा उखाणा ऐकून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
हेही वाचा… “मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
नव्या नवरीचा उखाणा व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा उखाणा सध्या जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नुकतंच लग्न झालेली नववधू कुटुंबासमोर खास उखाणा घेताना दिसतेय. असा भन्नाट उखाणा तुम्ही नक्कीच कधीही ऐकला नसेल. चला तर मग जाणून घेऊया नववधूने नेमका काय उखाणा घेतला…
सगळ्या सासरच्यांसमोर उखाणा घेत नववधू म्हणाली, “यांचा आणि माझा संसार होईल सुखकर, यांचा आणि माझा संसार होईल सुखकर, मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर” असा उखाणा घेत नव्या नवरीने चांगलाच हशा पिकवला.
नववधूच्या या उखाण्याचा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “उखाणा स्पेशल” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, मस्तच, उखाणा खूप चांगला होता. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “बाकीचं माहीत नाही, पण तुझ्याबरोबर कोणाचाही संसार सुखाचा होईल.” तर एकाने “बहीण खरं बोलून गेली” अशी कमेंट केली.