आज कालच्या पिढीसाठी रिलेशनशिप, डेटिंग, ब्रेकअप सर्वकाही अगदी सामान्य गोष्टी आहे. अनेकदा तरुण-तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी प्रेम व्यक्त करतात ज्याला प्रपोज करणे असे म्हणतात. पण त्याआधी अनेकदा तरुण-तरु मोकळेपणाने हलक्या फुलक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करतात ज्याला फ्लर्ट करणे असे म्हटले जाते.विषय जर रिलेशनशिप, डेटिंग, प्रपोज करणे, फ्लर्ट करण्याचा असेल तर मराठी तरुण कसे मागे राहतील. सध्या एका मराठी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुण एक पोस्टर घेऊन न्युयॉर्कमध्ये फिरत आहे. पोस्टरवर लिहिलेला मजकूर वाचून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले आहे.

मराठी तरुण कधी काय करतील याचा नेम नाही. फ्लर्ट करण्यासाठी अनेकदा तरुण-तरुणी वेगवेगळ्या पद्धती वापरतात पण मराठी मुलांना मात्र एकच पद्धत माहित असते. मराठी तरुणांनी कोणतीही मुलगी आवडली तर ते तिला फक्त एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे “जेवलीस का?” बास…पुढचं काम आपोआप होतं. अनेक तरुणांनी आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मुलीला असा मेसेज नक्कीच केला असेल किंवा मुलींना कोणत्या ना कोणत्या तरुणाने जेवलीस का प्रश्न विचारून फ्लर्ट केले असेल. पण एका मराठी तरुणाने आता हद्दच केली आहे. फ्लर्ट करण्यासाठी हा तरुण चक्क न्युयॉर्कमध्ये पोहचला आहे. एवढंच नाही तर “जेवलीस का?” असा प्रश्न लिहिलेले पोस्टर हातात घेऊन थेट न्युयॉर्कच्या रस्त्यावर हा तरुण फिरताना दिसत आहे. येणारे जाणारे लोक त्याकडे वळून वळून पाहत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर adityaa.jadhav नावाच्या मराठी तरुणाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तरुणाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुलांनो आम्ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलो आहोत!!”

हेही वाचा –“हे पुणे आहे भावा! इथे ॲलन वॉकर पण मराठीच वाजवतो”, तांबडी चामडी, गाण्यावर थिरकले पुणेकर, Video होतोय Viral

हा व्हिडिओ अनेक मराठी तरुणांना आवडला आहे. ज्यांनी व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “शहरातील प्रत्येक मराठी मुलीबरोबर फ्लर्ट प्रयत्न करतोय हा भाऊ”

हेही वाचा –पुणेकरांचा लाडका बाप्पा! श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग, Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

दुसऱ्याने कमेंट केली की, “महाराष्ट्रीयन तरुणांचा मुलींसाठी आवडता प्रश्न”

तिसऱ्याने कमेंट केली की,”जगभरात महाराष्ट्राचा स्वॅग! जेवलीस का? किंवा जेवलास का?”

“कुठे पण जाऊ एकच प्रश्न , जेवलीस का?”