Marine Drive Video Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. या व्हिडीओत नजर जाईल तिथवर फक्त लोकांची प्रचंड गर्दीच गर्दी दिसत आहे. या व्हिडीओवर मरीन ड्राइव्ह, मुंबई असे लिहले आहे. तसेच कॅप्शनमध्ये, हा जमाव एका विशिष्ट समुदायाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण खरंच अशाप्रकारे कोणत्या समुदायाने मरीन ड्राइव्ह परिसरात कोणता मोर्चा काढला होता का? याबाबत आम्ही तपास सुरु केला, तेव्हा आम्हाला व्हिडीओमागची एक सत्य बाजू समोर आली आहे. ती सत्य बाजू नेमकी काय आहे जाणून घेऊ..

काय होत आहे व्हायरल?

जन्नत जहाँन नावाच्या एक्स युजरने एक दिशाभूल करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

रिव्हर्स इमेज सर्चमधून उघड झाले की, व्हिडिओ खरोखर मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील आहे. यावेळी आम्हाला news18 marathi वरील एका बातमीचा स्क्रीनशॉट देखील आढळला.

हेही वाचा – मुस्लीम तरुणांकडून टोल प्लाझा कर्मचाऱ्यांवर दमदाटी अन् तोडफोड; व्हिडीओ खरा; पण नेमका कुठला? वाचा सत्य घटना

https://news18marathi.com/sport/icc-t20-world-cup-winner-team-india-victory-parade-wankhede-stadium-mild-lathi-charge-by-mumbai-police-mhpr-1208945.html

टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत झालेल्या विजय परेडमधील दृश्ये असल्याचे या बातमीतून सांगण्यात आले आहे.

आम्हाला अनेक सोशल मीडिया हँडलवर देखील हा व्हिडिओ सापडला, जो या वर्षी जुलै महिन्यात अपलोड करण्यात आलेला आहे.

असाच एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या एक्स हँडलवरही आढळून आला.

व्हायरल व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम लोगोसह ‘पूजाशुक्ला3698’ या नावाचा वॉटरमार्क होता. आम्ही इन्स्टाग्रामवर हे अकाउंट तपासले तेव्हा लक्षात आले की, या अकाउंटवरुन ४ जुलै रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ अलीकडे अपलोड केलेला नाही तर टीम इंडियाच्या T20 विजय परेडच्या वेळी अपलोड केला होता.

याशिवाय आम्हाला कमेंट सेक्शनमध्येही काही कमेंट्स आढळल्या ज्या त्या रिल व्हिडीओवर एक दिवसापूर्वी करण्यात आल्या होत्या. या कमेंट्समध्येही व्हायरल व्हिडिओसह शेअर केला जात असलेला खोटा आणि भ्रामक दावाच करण्यात आला आहे.

निष्कर्ष: टीम इंडियाने T20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात काढलेल्या विजय परेडचा जुना व्हिडिओ भ्रामक, खोट्या दाव्यांसह अलीकडे शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये कुठेही एका विशिष्ट समुदायाचा जमाव दिसत नाही.