फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने फेसबुकवर पोस्ट लिहून जाहीर माफी मागितली आहे. मार्क नेहमीच जगभरातील ताज्या घडामोडींवर आपलं मत मुक्तपणे व्यक्त करत असतो. एखादी गोष्ट आवडली नाही की तो जाहीररित्या त्यावर आपली नाराजी व्यक्त करतो. काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिम विरोधी धोरणांच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता. पण आता एका वेगळ्याच कारणाने त्याने माफी मागितली आहे. रशियाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचं पुराव्यानिशी समोर आलं. वॉशिग्टंन पोस्टने आपल्या बातमीत या संदर्भातलं वृत्त देखील प्रकाशित केलं आहे आणि यामुळे दु:खी झालेल्या मार्कने जाहीरपणे माफी मागितली आहे. ‘गेल्या वर्षभरात माझ्याकडून जे लोक दुखावले गेले त्यांची मी जाहीर माफी मागतो. माझ्या कामामुळे लोक एकत्र येण्याऐवजी ते अधिक दुरावले गेले, त्यामुळे हे दु:ख अधिक आहे. ही परिस्थिती मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन’ असं म्हणत मार्कने फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
… म्हणून मार्क झकरबर्गने मागितली जाहीर माफी
आरोप जिव्हारी लागले
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-10-2017 at 10:18 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg apologises for negative effects of facebook and asked for forgiveness