Mark Zuckerberg received gold chain by rapper: जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचे सीईओ व संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आपण घरबसल्या एकेमकांशी जोडले गेलो आहोत. मार्क झकरबर्ग हे फेसबुकमुळे जगभर प्रसिद्ध झालेले नाव. मेटा कंपनीच्या फेसबुक, व्हॉट्सॲप , इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी ॲप्सवर आपण मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर हवा तेवढा संवाद साधून, कामानिमित्त इतर गोष्टीसुद्धा करू शकतो आहोत.  तर, मार्क झुकरबर्ग सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असतात आणि नवनवीन गोष्टी इतरांबरोबर शेअर करीत असतात. आज त्यांना एक व्हिडीओ शेअर केला आहे. कारण- त्यांना खास व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाली आहे.

अमेरिकन गायक व रॅपर टी-पेनने मार्क झुकरबर्ग यांना एक खास भेटवस्तू दिली आहे. या भेटवस्तूत एक सोन्याची खास चैन देण्यात आली आहे. मार्क झुकरबर्ग यांना ही भेटवस्तू मिळाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी ही चैन घालून पाहताना एक व्हिडीओ शूट केला आहे. मार्क झुकरबर्ग बॉक्समधून चैन बाहेर काढतात. या चैनमध्ये एक त्रिकोणी पेंडेंट असते. तर हे पेंडेंट अमेरिकन गायक व रॅपर टी-पेनचे सिग्नेचर ट्रँगल पेंडेंट आहे. तसेच या सोन्याच्या चैनमध्ये आणखीन दोन खास गोष्टी काय आहेत यासाठी तुम्ही हा व्हिडीओ नक्की बघा…

हेही वाचा…Rubber Bands: रंगीबेरंगी हेअर रबर बँड कसे बनवले जातात माहिती आहे का? इवल्याश्या वस्तूसाठी घ्यावी लागते इतकी मेहनत; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले; किंमत कमी पण…’

व्हिडीओ नक्की बघा…

मेटाचा लोगो :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मार्क झुकरबर्ग भेटवस्तू दिलेल्या सोन्याची चेन घालून बघत असतात. ज्यामध्ये अमेरिकन गायक व रॅपर टी-पेनचे सिग्नेचर ट्रँगल पेंडेंट व मेटाचा लोगो देखील असतो. तर हे पाहून आणि हा व्हिडीओ शेअर करीत मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन रॅपरला धन्यवाद म्हंटले आहे. तसेच हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी नवीन ‘सेगमेंट एनीथिंग एआय रिसर्च मॉडेल’ उदाहरण दाखवत वेगवेगळ्या वस्तूंचा कसा मागोवा घेऊ शकतो हे सुद्धा दाखवलं आहे.

रॅपर टी-पेननेही (T-Pain) मार्क झुकेरबर्गच्या व्हिडीओवर , “मित्रा तू खूप छान दिसत आहेस” ; अशी कमेंट केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, मार्क झुकेरबर्गने अलीकडेच एका इंटरव्युव्हमध्ये परिधान केलेल्या सोन्याच्या चैनचे महत्त्व स्पष्ट केले.एका डिझायनरबरोबर काम करून ही चेन बनवली आहे ; ज्यावर एक प्रार्थना कोरली आहे. मार्क झुकरबर्ग त्यांच्या लेकीला दररोज रात्री झोपताना ही प्रार्थना म्हणून दाखवतात. ही प्रार्थना आरोग्य व धैर्यासाठी चांगली असते ; असे त्यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे.