मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक अकाऊटंवर मुलगी मॅक्ससोबतचा एक फोटो अपलोड केलाय. पिता होण्याचा आनंद मी अनुभवत आहे अशी ओळ लिहित मार्कने आपली लेक मॅक्स आणि पाळीव कुत्रा पुली यांचा फोटो फेसबुकवर अपलोड केलाय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्विमिंग आणि सायकलिंग करून झाल्यावर मार्क आपल्या घरात स्ट्रेचेस करत होता आणि वडिलांना पाहून छोटी मॅक्सही तसंच करण्याचा प्रयत्न करत होती. पण या नादात छोट्या मॅक्सचे पाय आपल्या बाबांच्या चेहऱ्यावर पडत होते. तर दुसरीकडे मार्कचा पाळीव कुत्रा पुलीही या बाप लेकीच्या आनंदात सहभागी झाला होता. मार्कने फेसबुकवर फोटो अपलोड करताच त्याला तीन लाखांहून अधिक लाईक्स आणि साडेतीन हजार शेअर्स देखील आहेत.

मार्कने याआधीही  छोट्या मॅक्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते. मॅक्स जिथे जिथे जाईल तिथे तिथे तिच्यासोबत पुली असतोच. काही महिन्यांपूर्वी मार्कने मॅक्सचा पुलीसोबत खेळतानाचा व्हिडिओ देखील अपलोड केला होता. २०१५ मध्ये मार्कने आपल्या मुलीला फेसबुकवर पत्रही लिहिले होते जे व्हायरल झाले  होते. मार्कचं नाव जरी श्रीमंत व्यक्तीच्या यादीत असलं तरी त्याची एकुलती एक मुलगी मॅक्स मोठी झाल्यावर तो ही सर्व संपत्ती तिच्या नावावर न करता  ती दान करणार आहे असंही मार्कने सांगितलं होतं.

वाचा : या जाहिरातीतला घोळ लक्षात आला का?

वाचा : ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमचा मुंबईत पहिला बळी?

Story img Loader