Video Shows Mark Zuckerberg Turns Nail Artist For Daughter : जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचे सीईओ व संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आपण घरबसल्या एकेमकांशी जोडले गेलो आहोत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी ॲप्सवर इतरांबरोबर संवाद साधत आहोत. पण, आपल्याला टेक्नॉलॉजीने जग जोडणारे मार्क झुकरबर्ग त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ कसा घालवत असतील, असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना? तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) लेकीसाठी नेल आर्टिस्ट बनले आहेत.

व्हायरल व्हिडीओत मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हेडसेट Quest 3S डोळ्यांवर लावतात. नेलपेंट कशी लावयची, असं त्या हेडसेटला विचारतात. त्यानंतर मग Quest 3S छोट्या-छोट्या स्क्रीनसह नेलपेंट कशी लावायची याची एकेक पायरी दाखवतो. मग ते लेकीला टेबलावर बसवून नेल आर्ट करण्यास सुरुवात करतात. वेगवेगळ्या रंगांच्या नेलपेंटच्या बॉटलमधून निळा-लाल रंग निवडतात, ते रंग लेकीच्या नखांवर लावतात. नेल आर्ट पूर्ण करण्यासाठी चमकीचा स्पर्शदेखील जोडतात. लेकीसाठी नेल आर्टिस्ट बनलेल्या मार्क झुकरबर्गचा व्हायरल व्हिडीओ तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…‘अश्रू तेव्हाचं येतात जेव्हा प्रेम…’ आजीला हॉस्पिटलमध्ये पाहून आजोबांना अश्रू अनावर, VIRAL VIDEO पाहून पाणवतील डोळे

व्हिडीओ नक्की बघा…

मुलीची हौस पूर्ण केली…

टेक्नॉलॉजी, बोर्डरूम मीटिंग्जच्या पलीकडे, मार्क झुकरबर्गदेखील ( Mark Zuckerberg) एका गोड मुलीचे प्रेमळ वडीलही आहेत. अशा या मार्क झुकरबर्ग यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांच्या मुलीची हौस पूर्ण केली आहे आणि तिच्यासाठी ते खास नेल आर्टिस्ट बनले आहेत. मेटाचा हेडसेट Quest 3S ची मदत घेऊन, आधी त्यांनी नेल आर्ट कसं करायचं याचा अभ्यास केला आणि मग अगदी खास पद्धतीनं लेकीच्या बोटांवर नेलपेंट लावली. तसेच त्यांनी या क्षणाचा एक खास व्हिडीओ बनवला आणि तो पोस्टदेखील केला आहे.

सोशल मीडियावर हा @zuck या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहेतसेच ‘वडिलांचे स्किल्स सुधारण्यासाठी साह्यभूत ठरणारा Quest 3S वापरणे म्हणजे एक नवीन अनुभव आहे’, अशी कॅप्शन मार्क झुकरबर्ग यांनी या व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘फादर ऑफ द इयर, नेलं आर्टिस्ट’, असं मार्क झुकरबर्गला म्हणताना कमेंटमध्ये दिसत आहेत. याआधीसुद्धा मार्क झुकरबर्ग यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून, लेकीच्या केसांची वेणी बांधली होती आणि एकदा रोड ट्रिपचा फोटोदेखील पोस्ट केला होता.