Gautami Patil Viral Video: महाराष्ट्रात सध्याच्या घडीला गौतमी पाटील आणि तिचा डान्स हा एक चर्चेचा विषय बनला आहे. गौतमी पाटीलचा डान्स असला की चर्चा तर होणारच, असे समीकरण पाहायला मिळतेय. मग यात कधी तिच्या अश्लील अदाकारीवरून, तर कधी कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून चर्चा रंगतात. यात्रा असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो वा पुढाऱ्यांचा वाढदिवस गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम आवर्जून ठेवला जातो. विशेषत: तरुणाईमध्ये लोकप्रिय गौतमी पाटीलची क्रेझ दिवसागणिक वाढताना दिसतेय. यामुळे गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी अगदी लहानांपासून मोठेही तुफान गर्दी करतात. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध होताना दिसतो. अशा परिस्थितीत एका सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमात चक्क गौतमी पाटीलचा मुखवटा घालून एका तरुणालाच नाचवले आहे. यात हा तरुण गौतमी पाटीलचा मुखवटा घालत बेभान होऊन नाचत आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर युजर्स आता गरिबांची गौतमी पाटील अशा कमेंट्स करत हसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजनिक कार्यक्रमातील आहे. जो काही युजर्स नाशिकमधील असल्याचा दावा करत आहेत. यात एका स्टेजवरील टेबलवर बसून एक तरुण पिवळ्या रंगाचे कपडे आणि चेहऱ्यावर गौतमी पाटीलचा मुखवटा घालून नाचतोय. यावेळी तो गौतमी पाटीलच्या काही फेमस झालेल्या डान्स स्टेप्स करताना दिसतोय. काही हटके डान्स करत तरुणाने गौतमी पाटीलला टक्कर दिली आहे. यावेळी तो गौतमी पाटीलच्या गाण्यावरच नाचत आहे. यावेळी उपस्थितीत लोकांनीही त्याला साथ दिली. तरुणाचा हा असा डान्स पाहून आता युजर्स पोट धरून हसत आहेत.

हेही वाचा – तरुणाची गौतमी पाटीलला टक्कर! लावणीवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत, एका युजरने लिहिले की, ‘बर्थ डेची ऑर्डर घ्याल काय?’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, गरिबांची गौतमी पाटील. तर आणखी एका युजरने लिहिलेय की, हीच गौतमी पाटील पाहिजे.

Story img Loader