Gautami Patil Viral Video: महाराष्ट्रात सध्याच्या घडीला गौतमी पाटील आणि तिचा डान्स हा एक चर्चेचा विषय बनला आहे. गौतमी पाटीलचा डान्स असला की चर्चा तर होणारच, असे समीकरण पाहायला मिळतेय. मग यात कधी तिच्या अश्लील अदाकारीवरून, तर कधी कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून चर्चा रंगतात. यात्रा असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो वा पुढाऱ्यांचा वाढदिवस गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम आवर्जून ठेवला जातो. विशेषत: तरुणाईमध्ये लोकप्रिय गौतमी पाटीलची क्रेझ दिवसागणिक वाढताना दिसतेय. यामुळे गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी अगदी लहानांपासून मोठेही तुफान गर्दी करतात. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध होताना दिसतो. अशा परिस्थितीत एका सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमात चक्क गौतमी पाटीलचा मुखवटा घालून एका तरुणालाच नाचवले आहे. यात हा तरुण गौतमी पाटीलचा मुखवटा घालत बेभान होऊन नाचत आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर युजर्स आता गरिबांची गौतमी पाटील अशा कमेंट्स करत हसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा