हे मार्केटिंगचे युग आहे, सर्व काही विकण्याची कला अवगत असलेला मार्केटचा राजा आहे. म्हणजे ज्याला मार्केटिंग चांगलं माहीत आहे तोच खरा मार्केटचा राजा आहे. अशा परिस्थितीत बाजारात टिकून राहण्यासाठी लोक नवीन मार्केटिंग तंत्र शोधतात. अनेकजण ग्राहकांना फसवून आपला माल विकतात. आजच्या काळात मार्केटिंग आणि जाहिरातींवर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्याशिवाय कामही भागत नाही. काहीतरी वेगळं केलं तरच ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात.असाच वेगळा विचार करून एका तरुणानं आपल्या समोशाची जाहिरात करण्यासाठी एक अनोखी आयडिया समोर आणली आहे. यासाठी त्यांनी शंभर रूपयांसारखा दिसणाऱ्या कागदाचा वापर केला. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत.
प्रँक पाहून तुम्हाला हसू येईल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये समोसा विक्रेत्याचे मार्केटिंग कौशल्य पाहून तुम्हाला हसू येईल. अर्थात यामध्ये समोसा विक्रेते ग्राहकांची फसवणूक करत असले तरी ही फसवणूक हलक्याफुलक्या पद्धतीने केली जातेय. ज्यामध्ये एका व्यक्तीची नजर समोसा स्टॉलजवळ पडलेल्या १००० रुपयांच्या नोटेवर पडते आणि ही नोट उचलण्यासाठी तो दुकानात जातो. समोसे विकत घेतो पण इतर कोणाची नजर या नोटेवर पडू नये म्हणून, तो जाऊन त्या नोटेवर पाय ठेवतो आणि आधी लपवतो. यानंतर ती व्यक्ती दुकानदाराकडून समोसे विकत घेते, समोसा विक्रेत्याने समोसे पॅक करून त्या व्यक्तीला दिले, त्यानंतर ती व्यक्ती खाली वाकून पडलेले पैसे उचलते. यावेळी दुकानदार ही नोट मागे खेचतो आणि हसायला लागतो.
मार्केटींग आयडीया
मार्केटींग आयडीया म्हणून त्यानंच ही नोट अशाप्रकारे तिथे ठेवलेली असते. तेव्हाच त्या व्यक्तीला कळते की ती नोट कोणीतरी धाग्याने बांधली होती. त्या व्यक्तीसोबत झालेल्या या मजेदार प्रँकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जात आहे. यावर युजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> शिमला मिरची कापताच बाहेर हे काय आलं? बाजारातून भाजी विकत घेताना १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल
वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ i__am____kabeer नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत होते. एका वापरकर्त्याने लिहिले…व्वा, किती आश्चर्यकारक मार्केटिंग कौशल्य आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… वापरकर्त्यांना मूर्ख बनवणे थांबवा, हे सर्व पूर्वनियोजित आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… समोसा विक्रेत्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे.