Viral photo: हे मार्केटिंगचे युग आहे, सर्व काही विकण्याची कला अवगत असलेला मार्केटचा राजा आहे. म्हणजे ज्याला मार्केटिंग चांगलं माहीत आहे तोच खरा मार्केटचा राजा आहे. अशा परिस्थितीत बाजारात टिकून राहण्यासाठी लोक नवीन मार्केटिंग तंत्र शोधतात. अनेकजण ग्राहकांना फसवून आपला माल विकतात. आजच्या काळात मार्केटिंग आणि जाहिरातींवर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्याशिवाय कामही भागत नाही. काहीतरी वेगळं केलं तरच ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात.असाच वेगळा विचार करून एका तरुणानं आपल्या दुकानात महिलांनी भाजी खरेदी करायला यावं म्हणून करण्यासाठी एक अनोखी आयडिया समोर आणली आहे. यासाठी त्यानं आपल्या भाजीपाल्याच्या दुकानात एक पाटी लिहून ठेवली आहे. सोशल मीडियावर ही पाटी व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
अलीकडची तरुणाई तर अक्षरश: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावर तुटून पडलेली असते. परंतु म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे वाईटच…सोशल मीडियाचा अतिवापर ही आजकालच्या तरूणाईपुढची प्रमुख समस्या बनली आहे. हल्ली सगळेच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. पूर्वी तासनतास स्वयंपाक घरात दिसणाऱ्या महिला हल्ली वेळ काढून निवांत मोबाईल बघत बसतात. आता आई मॉर्डन झाली आहे त्यामुळे मुलांची काळजी आणि प्रेमही हल्ली आईच्या व्हॉ स्टेटसवर पाहायला मिळते. अशातच एका भाजीवाल्यानं हल्लीच्या व्यस्थ दिनचर्या असणाऱ्या किंवा नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या महिलांचं काम सोपं केलं आहे. या भाजी वाल्यानं आपल्या दुकानात अशी पाटी लावली आहे की पाहून सर्वच महिला गर्दी करतील.
आता तुम्ही म्हणाल अशी कोणती पाटी लावली आहे? तर या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक चिमुकला हातात पाटी घेऊन बसला आहे. या पाटीवर “महिलांना व्हॉट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्रामसाठी वेळ मिळावा म्हणून आमच्याकडे चिरलेल्या भाजा विकत मिळतील.” ही पाटी वाचून नेटकरी हसत आहेत. भाजी विक्रेत्याचे मार्केटिंग कौशल्य पाहून तुम्हाला हसू येईल.
पाहा मार्केटिंगची भन्नाट आयडीया
हेही वाचा >>Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
हा फोटोtushar_ghongade_999 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत होते. एका वापरकर्त्याने लिहिले…व्वा, किती आश्चर्यकारक मार्केटिंग कौशल्य आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… भाजी विक्रेत्याला २१ तोफांची सलामी दिली पाहिजे.