सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल याची कल्पनाही करता येत नाही. कधी कधी आपण अशा काही गोष्टी पाहतो, ज्या आपल्या कल्पनेबाहेरच्या असतात. आपण जगाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या माणसांच्या जीवनाविषयी जाणून घेऊ शकतो. लोक त्यांची क्रिएटिव्हिटी काही मिनिटांत जगासोबत शेअर करतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये लोक आपापल्या नवीन कलाकृती दाखवीत असतात. जुगाड करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. लोक असे जुगाड करतात की, एखाद्या इंजिनीयरलाही लाज वाटेल. यातील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात; तर काही व्हिडीओंमधून आपल्याला नवनवीन टेक्निक समजतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे; जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता सोशल मीडियावर पाकिस्तानातील विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये एक तरुण मागील सीटवर बसलेल्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरून कारचे स्टेअरिंग नियंत्रित करताना दिसत आहे. ही कार मारुती सुझुकीची अल्टो कार आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये कार महामार्गावर जाताना दिसत आहे. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर कोणीही बसलेले नाही. तरीही गाडी रस्त्यावर धावताना दिसत आहे.

(हे ही वाचा : मुक्या प्राण्याबरोबर खेळत होता खेळ अन् पाच सेकंदातच जबड्यात असं पकडलं की, Video व्हायरल )

कारच्या मागील सीटवर एक तरुण

या व्हिडीओमध्ये ड्रायव्हर नसलेल्या या गाडीच्या आजूबाजूला इतर वाहनेही रस्त्यावर येताना दिसत आहेत. कारच्या मागील सीटवर एक तरुण बसला आहे. त्याच्याकडे कॉम्प्युटरचा कीबोर्ड आहे आणि त्यातून निघालेल्या काही वायरी गाडीच्या स्टेअरिंगला जोडल्या गेल्या आहेत.

कार ४०kmph च्या वेगाने पुढे जातेय

कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या साह्याने कार चालवीत असल्याचा दावा तरुणाने केला आहे. व्हिडीओमध्ये जेव्हा तो कीबोर्डवर क्रिया करतो तेव्हा कारचे स्टेअरिंग हलताना दिसत आहे. कार ४०kmph च्या वेगाने धावत असल्याचा दावा तरुणाने केला आहे. त्याने स्वतः ही यंत्रणा गाडीत बसवली आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानातील अबोटाबाद येथील असल्याची माहिती आहे. युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून, हा व्हिडीओ ते शेअर करीत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्युज आणि कमेंट्स मिळत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत. “अपघात झाला तर डिलीट बटण दाबा”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. दुसरा म्हणाला, “बॉम्ब बनवता बनवता पाकिस्तानच्या लोकांनी काय केले?”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti alto car running with keyboard pakistan viral video on social media pdb
Show comments