लॉटरी जिंकण्यासाठी नशीब पाहिजे असे काही लोक म्हणतात. मात्र बुद्धी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ती जिंकता येते, असे यूएसमधील एका व्यक्तीने दाखवून दिले आहे. मेरिलँड, यूएसए येथील एका व्यक्तीने २० वर्षे लॉटरीच्या अंकांचे निरीक्षण केले, अभ्यास केल्यानंतर या व्यक्तीला आता ४१ लाख रुपयांची मोठी लॉटरी लागली आहे.

७७ वर्षीय व्यक्तीने अनेक वर्षे अंक वापरलीत आणि शेवटी लॉटरी जिंकलीच. आपल्याकडे पोटोग्राफिक मेमरी असल्याचे या व्यक्तीने मेरिलँड लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या व्यक्तीने त्याच्याकडील लकी नंबर अनेक वर्षे वापरलीत, अलिकडे १६ सप्टेंबरच्या लॉटरीसाठी त्याने या अंकांचा वापर केला होता.

(TINDER : डेटिंग अ‍ॅपवर नाव टाकताना केलेली चूक पडली भारी, नेटकऱ्यांनी व्यक्तीला केले भरपूर ट्रोल, वाचा हे मजेदार प्रकरण)

पूर्वीच्या काही बोनस मॅच ५ लॉटरी ड्रॉचे अंक आणि अंकांचे गट आपल्याला लक्षात होते. ते माझ्या डोक्यात होते. जेव्हा टीव्हीवर जिंकणाऱ्या लॉटरीचे नंबर दाखवण्यात आले तेव्हा ते आपण चटकन ओळखल्याचे या व्यक्तीने सांगितले. माझे चार अंक अनेकदा लॉटरीशी मॅच झाले, पण पाचही नंबर मॅच होईल, असे कधी माझ्या मनातही आले नाही, असे लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने सांगिले. या व्यक्तीने ४१ लाख रुपयांची लॉटरी जिंकली. आता या पैशाने कार घेण्याची या व्यक्तीची तयारी आहे.

लॉटरीच्या २०० तिकीट घेऊन एकाने जिंकले ८ कोटी

संभाव्यतेची तत्वे लावून एका व्यक्तीला ८ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. व्यक्तीने एकाच ड्रॉची एकसारख्या २०० तिकीट खरेदी केल्या होत्या. अली घाईमी यांनी ०-२-६-५ या नंबरचा वापर २०० लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी केला होता. दिलेले अंक या व्यक्तीचे जन्म वर्ष आणि महिना दर्शवतात. या व्यक्तीला नंतर लॉटरी लागली.