Maharashtra Bank ATM Robbery Viral Video : राज्यातील बीड जिल्ह्यात एका चोरीच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमध्ये मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. कारच्या माध्यमातून चोरी करण्याचा डाव त्यांनी आखला होता. मात्र, घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने या चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी चोरीच्या घटनेच्या तपास सुरु केला आहे. दरम्यान, चोरट्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
६ सप्टेंबरला बुधवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असल्याची माहिती समोर आलीय. दोन चोरटे एटीएममध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. चोरट्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून एटीममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान, दुसऱ्या चोरट्याला त्यांनी कार घेऊन महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमजवळ बोलावले होते. बीडमधील येलंबघाट येथे महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असता या एटीएममध्ये असलेल्या सुरक्षिततेच्या यंत्रणेमुळे स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नक्की वाचा – Optical Illusion : तुम्ही हुशार आहात का? मग ८ सेकंदात शोधून दाखवा चित्रात लपलेला ८ नंबर
इथे पाहा ATM चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धक्कादायक व्हिडीओ
मात्र, पोलीस येण्याआधीच चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला होता. चोरट्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “हॉलिवूड चित्रपट ‘फास्ट अॅंड फ्यूरिअस’च्या माध्यमातून या चोरट्यांनी ही रणनीती आखली असावी. बॅंक वॉल्ट चोरीचा एक सीन या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कारच्या माध्यमातून एटीएम तोडण्याचा प्लॅन चोरट्यांनी केला होता. या चित्रपटातही अशाच प्रकारचे सीन दाखवण्यात आले आहेत.”