‘One Chip Challenge’: सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हायरल चँलेजेस पाहायला मिळतात. यातील अनेक चँलेजेस जीवघेणे ठरतात, परंतु तरुणाई जीवाची पर्वा न करता ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आता असेच चँलेज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात ‘वन चिप चॅलेंज’मध्ये भाग घेत असताना पीडित तरुणाचा अपघात झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅलेंजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप किशोरच्या कुटुंबीयांचा आहे.

‘वन चिप चॅलेंज’

‘वन चिप चॅलेंज’ हे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं चँलेज होतं, यामध्ये जगातील सर्वात मसालेदार चिप्स खाऊन दाखवायचे होते. आणि याच चँलेजमध्ये या तरुणानं सहभाग घेतला आणि जगातील सर्वात मसालेदार चिप्स खाल्ल्याने दहावीच्या एका मुलाचा अचानक मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, तरुणाचं नाव हॅरिस वोलोबा असे आहे. हे चँलेंज पूर्ण केले त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. तो केवळ १४ वर्षांचा होता.

हॅरिसच्या आईने सांगितले की, मुलाने शाळेत खूप मसालेदार चिप्स खाल्ले होते, त्यानंतर त्याला पोटदुखी होऊ लागली. मात्र, हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर हॅरिसला बरे वाटू लागले. आईने सांगितले की, रुग्णालयातून घरी आल्यानंतर तिची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्याला पुन्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

यापूर्वीही गेले अनेक बळी

यापूर्वीही या चँलेंजमुळे अनेक बळी गेले आहेत. गेल्या वर्षी, कॅलिफोर्निया शाळेतील तीन हायस्कूल विद्यार्थ्यांना व्हायरल “वन चिप चॅलेंज” ट्रेंडमध्ये भाग घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अॅडम ऑरबॅच यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला समान समस्येचा सामना करावा लागला. मसालेदार चिप्स खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. काही विद्यार्थ्यांनी उलट्या होत असल्याच्या तक्रारीही केल्या.

हेही वाचा >> Video: सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अचानक सर्वजण नाचू लागले; नेमकं काय घडलं? चकित करणारं कारण आलं समोर

वन चिप चॅलेंज म्हणजे नक्की काय?

वन चिप्स चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, गरम मिरचीपासून बनवलेल्या चिप्स खावे लागतात. आणि त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायचा असतो. यादरम्यान #onechipchallenge हा हॅशटॅग वापरला जातो. हे चॅलेंज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे आव्हान पूर्ण करताना अनेक मुले अपघाताचे बळी ठरली आहेत.

Story img Loader