Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding Cake: मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा जामनगरमधील प्री वेडिंग सोहळा जगभरात गाजतोय. नीता अंबानींच्या साडीपासून ते राधिका, श्लोका, ईशाच्या अत्यंत सुंदर ड्रेसपर्यंत प्रत्येक गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अंबानींच्या दिमाखदार सोहळ्यात सजावट व जेवणाची सोयही अफलातून होती हे वेगळं सांगायला नकोच पण सध्या ऑनलाईन एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून डोळ्यावर विश्वास ठेवणे सुद्धा कठीण होत आहे. नजरही पोहोचत नाही इतका उंच केक या सोहळ्यासाठी तयार केला होता असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात येत आहे. अंबानींनी केक आणलाय की महाल बांधलाय असा प्रश्न कॅप्शनमध्ये लिहीत लोक हा व्हिडीओ शेअर करतायत पण या व्हिडिओची एक वेगळी बाजू समोर येत आहे.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Abhishek Ranjan ने वायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

"I like Santa Claus too but..." Seeing 'this' plate in Vasudeva's hand, everyone stopped on the road; video goes viral
“सांताक्लोज मलाही आवडतो पण…” वासुदेवाच्या हातातील ‘ही’ पाटी पाहून रस्त्यावर सगळेच थांबू लागले; VIDEO एकदा पाहाच
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video…
ladies group dance
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
Pune Video
Pune Video : पुण्यात ख्रिसमसचं जंगी सेलिब्रेशन; MG रोडचा VIDEO VIRAL
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओमधील कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला @spotlightalert या इंस्टाग्राम पेज वर अपलोड केलेला हा व्हिडीओ सापडला.

जामनगरमधील विवाहपूर्व उत्सवापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये व्हिडिओ पेजवर पोस्ट करण्यात आला होता. आम्हाला news18.com च्या वेबसाईटवर एक बातमी देखील आढळून आली.

https://www.news18.com/viral/watch-couple-celebrates-their-wedding-with-massive-hogwarts-castle-themed-cake-8641748.html

Unilad च्या इंस्टाग्राम पेजने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी केकचा व्हिडिओ त्याच्या तपशीलांसह पोस्ट केला होता.

त्याचा व्हिडिओ ४ जून २०२३ रोजी reddit.com वर अपलोड करण्यात आला होता.

त्याच व्हिडिओच्या फेसबुक रीलपैकी एकावर, एका वापरकर्त्याने हा लग्नासाठी बनवलेला केक तुर्कमेनिस्तान किंवा उझबेकिस्तानमधील असल्याचे सांगितले आम्ही अंबानी प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये वेडिंग केकबद्दलचे रिपोर्ट्स देखील तपासले, पण आम्हाला त्याबद्दलचे कोणतेही वृत्त आढळले नाही.

हे ही वाचा<< अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यात इलॉन मस्ककडे लक्षच गेलं नाही? शेरवानी घातलेले मस्क पाहिलेत का, आता कळतंय की..

निष्कर्ष: किल्ल्यासारखा आकार असलेल्या केकचा व्हिडिओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

Story img Loader