तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात. अनेक लोकांसाठी हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. लोक आपल्या प्रियजनांसह याठिकाणी वेळ घालवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित लोकांसोबत एक धक्कादायक अपघात होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्राझीलच्या रिओ डी जनेरियोमध्ये एक समुद्रकिनारा आहे, ज्याचे नाव लेब्लॉन आहे. या समुद्रकिनाऱ्यावर लोक अनेकदा ये-जा करतात. तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळा समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटा उसळतात. कधी भरती तर कधी अहोटी. नुकतीच लेबलॉन बीचवर अशीच एक घटना पाहायला मिळाली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान झालं असं की, या बीचवर मोठ्या संख्येने लोक आले होते. समुद्रकिनारी सर्वजण खुर्च्यांवर बसले होते. काही लोक उभेही होते, तर काहीजण पाण्यात मजा करत होते. तेवढ्यात अचानक एक मोठी लाट वेगाने उसळते आणि समुद्रकिनाऱ्यावर येते.

या भल्याोठ्या लाटेनंतर काय झाले ते व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. लाट येताच समुद्रकिनारी उभी असलेली माणसे अक्षरश: पाण्यात वाहू लागली. खुर्च्यांवर बसलेल्या लोकांचाच नाही तर उभ्या असलेल्या लोकांचाही तोल गेला.. तेसुद्धा लाटेसह पाण्यात जाऊ लागले. ही लाट एवढी अचानक आली की लोकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> काय सांगता! शिक्षकच गेले विद्यार्थ्याच्या घरी, ‘या’ शिक्षकाचा VIDEO पाहून म्हणाल शिक्षक असावा तर असा…

व्हिडिओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की जेव्हा समुद्रातून लाट येत होती तेव्हा किनाऱ्यावर उभा असलेला एक व्यक्ती एका लहान मुलीसोबत लाट येताना पाहत होता. मात्र, ही लाट इतकी घातक असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. या लाटेने किनाऱ्यावरील सर्वांनाच आपल्यासोबत नेले. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.