सध्या सोशल मीडियावर अनेक स्टारकिड्सची सातत्याने चर्चा होत असते. न्यासा देवगण, आरव, जान्हवी कपूर या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचाही समावेश होतो. तिच्या सौंदर्याचे सर्वजणच चाहते आहेत. ती कायमच विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. याचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.
सारा तेंडुलकरने नुकतंच तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने जंगी सेलिब्रेशन केलं आहे. याचा एक व्हिडीओही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओला तिने छान कॅप्शनही दिले होते. “नाईट ड्रेस घालून आणि खूप खूप खूप प्रेमाबरोबर २५ व्या वर्षात पदार्पण”, असे तिने या फोटो कॅप्शन देताना म्हटले होते.
आणखी वाचा : सारा तेंडुलकरचा २५ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो पाहिलेत का?
त्यानंतर आता नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरने दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या बहिणीला शुभेच्छा देताना अर्जुनने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा ही अर्जुनच्या मांडीवर बसल्याचे दिसत आहे. हा फोटो फारच गोड असून त्यात ते दोघेही हसताना दिसत आहे. यावर त्याने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सारा तेंडुलकर’ असे म्हटले आहे.
दरम्यान सारा एक प्रोफेशनल मॉडेल असून तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेतही असतात. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या साराचे इन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावेळी सचिन तेंडुलकरनं स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला होता.