भारतीय जेवणाची चव अनेकांना आवडतेच, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. तुम्ही जगाच्या कुठल्या भागातून आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला भारतीय जेवणाची चव नक्कीच आवडेल. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या शोमध्येही असेच झालं. शोच्या परीक्षकांना एक भारतीय नाश्ताचा पदार्थ खूप आवडला. भारतीय स्नॅकटाईमसाठी ही डिश अतिशय सामान्य आहे पण मास्टरशेफच्या परीक्षकांना त्या पदार्थाची चव खूपच आवडली. ही डीश आहे भेळ पुरी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पर्धक सारा टॉडने एका फेरीत भेळ पुरी बनवली. ही डिश बनवायला तिला फार कमी वेळ लागला. भेळ पुरी किती चविष्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्याला बनवायला फारसा वेळ लागत नाही. बहुतेक भारतीयांसाठी, हा एक मुख्य नाश्ता आहे. या सोप्या पण चटकदार पदार्थाच्या प्रेमात ऑस्ट्रेलियाचे शेफ पडले आहेत आणि याचीच सोशल मीडियावर चर्चा आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या शोची आणि शो मध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची नेहमीच चर्चा होते. अनेक स्पर्धक यात भारतीय पदार्थ बनवताना दिसले आहेत, याचमुळे हा शो भारतातही नेहमी चर्चेत असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masterchef australia judges blown away by bhel puri they praise indian dish ttg