कोणाचे नशीब कधी पालटेल हे कुणीही सांगू शकत नाही. असाच एक प्रकार नोएडातील एका व्यावसायिकासोबत घडलाय. उत्खनना दरम्यान या व्यावसायिकाला हिऱ्याचा एक मौल्यवान तुकडा सापडला आहे. ज्याची किंमत जवळपास ४० लाखांपर्यंत सांगितली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हा हिरा ‘डायमंड ऑफिस’ मध्ये लिलावासाठी ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीना राणा प्रताप हे मटेरियल सप्लायर आहेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोएडाच्या सेक्टर मध्ये राहणाऱ्या मीना राणा प्रताप हे मटेरियल सप्लायर आहेत. त्यांना पन्नाच्या हिऱ्याच्या खाणीत ९.६४ कॅरेटचा हिरा सापडला आहे. ज्याची किंमत सुमारे ४० लाख सांगण्यात येत आहे. मीना राणा प्रताप यांनी सिरस्वाहातील भरका खाण परिसरात लीज म्हणून पन्ना येथे हिऱ्याची खाण उभारली आहे. जिथे त्यांना अनेक छोटे हिरे मिळत आले आहेत.

( हे ही वाचा: Baba Vanga: नवीन युगातील बाबा वेंगा बनली ‘ही’ १९ वर्षीय युवती; २०२२ मध्ये तिने केलेल्या ‘या’ भविष्यवाण्या ठरल्यात खऱ्या)

लिलावात या हिऱ्याची मिळू शकते चांगली रक्कम

अचानक मिळालेल्या हिऱ्यामुळे मीना राणा प्रताप खूप खुश आहे. हिऱ्यांमधून मिळणाऱ्या पैशातून गरीब मुलांनाही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याचवेळी हिऱ्याचे परीक्षण करणारे म्हणतात की हा हिरा अनमोल आहे. ज्याला लिलावात चांगली रक्कम मिळू शकते.