Mathura Train Accident Updates : उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शन येथे मंगळवारी रात्री रेल्वेचा मोठा अपघात झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वेगात आलेली शकूरबस्ती-मथुरा ईएमयू गाडी अचानक प्लॅटफॉर्मवर चढली. त्यामुळे तेथे उपस्थित लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी आरडाओरडा सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. सध्या अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.

मंगळवारी शकूरबस्तीवरून येणारी ईएमयू ट्रेन प्रवाशांना उतरवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पोहोचली तेव्हा अचानक तिचा वेग पुन्हा वाढला आणि ट्रेन प्लॅटफॉर्म तोडून वर चढली. अपघाताच्या वेळी काही लोक प्लॅटफॉर्मजवळ उभे होते, असे सांगण्यात येत आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे ट्रेन प्लॅटफॉर्मजवळ येताना दिसताच लोकांनी तेथून पळ काढला. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. गाडी प्लॅटफॉर्मवर चढताच ओएचई लाईनचा खांब समोर आला. त्यावर धडकल्यानंतर ट्रेन थांबली.
हेही वाचा – “…नाहीतर तुला जीवे मारले जाईल”, ‘Iron Man’ चित्रपट पाहण्यासाठी ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना दिली धमकी; पत्र व्हायरल

मथुरा स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी सांगितले की, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते आणि या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही गाडी शकूर बस्ती येथून येते आहे त्यांनी सांगितले. १०.४९ ला ट्रेन आली. सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. स्टेशन डायरेक्टरने सांगितले की, अचानक ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेमागचे कारण आम्ही तपासत आहोत. ते म्हणाले की, अपलाइनवरील काही गाड्यांवर या अपघाताचा परिणाम झाला आहे.

हेही वाचा – रिलसाठी कायपण! अजय देवगण स्टाइलमध्ये तरुणीने केले स्टंट! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, ”हा तर मुर्खपणा”

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे काम सुरू आहे. गाड्या हटवल्यानंतर , अपलाइनवरील गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील.

Story img Loader