टॉय आणि एंटरटेनमेंट कंपनी मॅटेल(Mattel) त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नवीन कार्ड गेम, UNO क्वाट्रो घेऊन येत आहे. ही कंपनी सध्या या नव्या गेमची ओळख करून देण्यासाठी “चीफ UNO प्लेअर” च्या शोधात आहे. या महत्त्वाच्या पदासाठी ही कंपनी दर आठवड्याला तब्बल $ ४,४४४ (अंदाजे रु. 3.6 लाख) च्या एवढा पगार देणार आहे, तेही आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्यासाठी. ही ऑफर ऐकूण तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे.
हेही वाचा – तब्बल ३ दिवस लिफ्टमध्ये अडकली होती महिला, मदतीसाठी ओरडत राहिली अखेर….
या सुवर्णसंधीबद्दल मॅटेलचे उपाध्यक्ष आणि गेम्सचे जागतिक प्रमुख रे अॅडलर उत्साही आहेत. आपला उत्साह व्यक्त करताना त्यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले, कोणाला दुपारी UNO खेळायला आवडणार नाही? विशेष तेव्हा जेव्हा त्यांना यासाठी पगार मिळत असे तेव्हा. UNO च्या चाहत्यांना आमच्याबरोबर जोडून ठेवण्यासाठी आम्ही नेहमी नविन पर्याय शोधत असतो आणि आणि पहिल्या-वहिल्या “चीफ UNO प्लेअर” देशभरात शोध घेणार आहोत. आम्ही चाहत्यांसाठीअसा वैयक्तिक गेमप्ले ( in-person gameplay)आणत आहोत जो त्यांनी यापूर्वी कधीही अनुभला नसेल. . UNOच्या उत्तम UNO प्लेयरला हे स्थान देताना आम्हाला आनंद होत आहे जो आम्हाला आमचा नवीन गेम, यूएनओ क्वाट्रो, जगासमोर आणण्यास मदत करेल.”
अर्ज करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट आहे. अलीकडील बार्बी चित्रपटाच्या यशाने मॅटेल कंपनीला प्रेरित केले आहे. त्यांच्या इतर टॉय, गेम्स आणि ब्रँडसह असेच यश मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
हेही वाचा – Optical Illusion : फोटोत तुम्हाला सिंह दिसतोय पण, तो सिंह नव्हेच! हुशार असाल तर ५ सेकंदात शोधा उत्तर
“चीफ UNO प्लेअर होण्याची आणि चाहत्यांशी संवाद साधण्याच्या मॅटेलच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा एक भाग बनण्याची ही अनोखी संधी जगभरातील UNO प्रेमींना नक्कीच उत्साहित करेल.