अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आलेल्या लीजेंड ॲण्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये २१ वर्षीय अमेरिकन तरुणाने इतिहास रचला आहे. कमी वेळात ३x३x३ रुबिक क्यूब सोडवून रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या या तरुणाचे नाव मॅक्स पार्क आहे. सध्या सोशल मीडियावर मॅक्स पार्क आणि त्याच्या या वर्ल्ड रेकॉर्डची चांगलीच चर्चा सुरू आहे.

मॅक्स पार्कने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

मॅक्स पार्कनी ३x३x३ रुबिक क्यूब फक्त ३.१३ सेकंदात सोडवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याआधी कमी वेळात रुबिक क्यूब सोडविण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या एका युशेंग डू नावाच्या व्यक्तीकडे होता. २०१८ मध्ये युशेंग डू याने ३.४७ मिनिटांमध्ये रुबिक क्यूब सोडवला होता पण आता मॅक्सने हा रेकॉर्ड मोडला आहे.

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?
Squirrel and new born baby video
‘आई कोणाचीही असो…’ नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जगवण्यासाठी खारुताईची धडपड; VIDEO पाहून येईल आईची आठवण
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

हेही वाचा : हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू, आईनं रडत २ किलोमीटरपर्यंत घातला गोंधळ; Video पाहून येईल डोळ्यात पाणी

व्हिडीओ व्हायरल

Guinness World Records च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा मॅक्सचा रुबिक क्यूब सोडवितानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मॅक्सनी फक्त ३.१३ सेकंदात कसा रुबिक क्यूब सोडवला. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की मॅक्सने खूप कमी वेळात रुबिक क्यूब सोडवून वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले आणि टाळ्या वाजवून मॅक्सचे कौतुक केले. मॅक्सच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.

मॅक्सच्या नावे आणखी कोणते रेकॉर्ड आहेत?

मॅक्सने ३.१३ सेकंदात ३x३x३ रुबिक क्यूब सोडवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे, मात्र याआधीही त्याच्या नावी ४x४x४, ५x५x५, ६x६x६ आणि ७x७x७ स्पीड क्यूबिंगचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे

हेही वाचा : VIDEO : महाराष्ट्राची अनोखी परंपरा, वारीत मुस्लीम व्यक्तीने धरला विठ्ठलाच्या भजनावर ठेका अन्…

कोण आहे मॅक्स?

२८ नोव्हेंबर २००१ रोजी जन्मलेल्या मॅक्स पार्कला ‘Rubik’s Cube speedsolver’ म्हणून ओळखले जाते. मॅक्सच्या नावे स्पीड क्यूबिंगचे अनेक रेकॉर्ड आहे. मॅक्स सीरिटोस कॅलिफोर्नियामध्ये (Cerritos California) राहतो. त्याच्या आईवडिलांचे नाव मिकी आणि श्वान पार्क आहेत.
मॅक्स जेव्हा दोन वर्षांचा होता तेव्हापासून तो ऑटिझम या आजाराने त्रस्त आहे. ऑटिझम हा एक प्रकारचा न्यूरो डेव्हलपमेंट प्रकार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला संवाद साधताना किंवा परस्पर बोलताना अडचण येते. ऑटिझम आजाराने ग्रस्त असूनसुद्धा मॅक्सने केलेल्या आतापर्यंतचे वर्ल्ड रेकॉर्ड कौतुकास्पद आहेत. मॅक्सवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.