मॅकडॉनल्डचे खाद्यपदार्थ कोणाला आवडत नाहीत. परेदशासह आपल्या देशातही मॅकडॉनल्ड खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत. मॅकडॉनल्ड खाद्यपदार्थ जितके त्यांच्या चवीकरिता प्रसिद्ध आहे तितकेच ते त्यांच्या धोरण आणि कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. मॅकडॉनल्डची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, जी नेहमी पाळली जाते. पण या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे. मॅकडॉनल्डच्या खाद्यपदार्थामुळे एका चार वर्षीय मुलीला चटका बसल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे आणि यासाठी त्यांनी मॅकडॉनल्डविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. चला जाणून घेऊ या काय आहे प्रकरण.

मॅकडॉनल्डच्या खाद्यपदार्थामुळे ४ वर्षीय मुलीला चटका बसल्याचा पालकांचा दावा

युनायडेट स्टेट्समधील चार वर्षीय मुलीला मॅकडॉनल्डच्या खाद्यपदार्थामुळे चटका बसल्यामुळे तिच्या पालकांनी मॅकडॉनल्डच्या विरोधात १५ हजार डॉलर्सपर्यंत नुकसानभरपाईचा दावा केला आहे. फ्लोरिडामधील ब्रॉवर्ड शहरातील फिलाना होम्स(Philana Holmes) आणि हंबरटो काराबॅलो एस्टेवेझ (Humberto Caraballo Estevez) अशी या मुलीच्या पालकांची नावे आहेत. सन सेंटीनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, खराब प्रशिक्षण आणि निष्काळजीपणासाठी मॅकडॉनाल्ड तसेच त्याचे ऑपरेटर अपचर्च फूड्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या मुलीच्या पालकांनी घेतला.

Pune, girl died drowning pune, water tank pune,
पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Two girls sexually assaulted by father in Versova Mumbai news
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
Rape of minor girls in Vasai and Nalasopara
Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार
A nine year old girl was sexually assaulted by her father in malad mumbai news
sexually assaulted case: नऊ वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
kidnap, girl, kidnap attempt thane,
ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा – अनेकांच्या आवडीचे कार्टून पात्र असलेल्या शिनचॅनला आवाज देणारी व्यक्ती आहे तरी कोण? जाणून घ्या

चिकन मॅक-नगेट्स खाताना मुलीला बसला होता चटका

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, घडले असे- साधारण २०१९मध्ये होम्स यांनी त्यांच्या मुलीसाठी Tamarac मॅकडॉनल्ड येथून ‘चिकन मॅक-नगेट हॅपी मील’ घेतले होते. ज्यानंतर तिला दुखापत झाली.

होम्स यांच्या मतानुसार, त्यांनी त्यांच्या मुलीला चिकन मील दिले आणि कार सुरू करण्यापूर्वीच तिची किंचाळी ऐकू आली.

फिर्यादीनुसार, होम्स यांची चार वर्षांची मुलगी तेव्हा चिकन मॅक-नगेट्स खाण्याचा प्रयत्न करत होती, पण ते तिच्या हातातून मांडीवर पडले आणि तिला गरम नगेट्सचा चटका बसला होता. ते साधारण दोन मिनिटे तिथेच राहिले असेल.

चिकन नगेट ९३.३ सेल्सिअस इतके गरम असल्याचा वकिलांचा दावा

सन सेंटीनलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हॅपी मीलमध्ये देण्यात आलेले चिकन मॅक-नगेट्स हे अत्यंत गरम होते जे धोकादायक होते आणि जे त्या मुलीच्या मांडीवरील त्वचा जळण्यास कारणीभूत ठरले, असेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

वकिलांनी न्यायालयात असेही सांगितले की, चिकन नगेट २०० डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच ९३.३ सेल्सिअस इतके गरम होते आणि त्यामुळे भाजल्यानंतर या मुलीच्या मांडीची त्वचा विकृत झाली आणि तिला जखम झाली होती.

हेही वाचा – केदारनाथमध्ये वाट चुकली होती ६८ वर्षीय महिला, गुगल ट्रान्सलेटरमुळे पुन्हा भेटली कुटुंबीयांना, कसे ते जाणून घ्या

मॅकडोनाल्डने फेटाळला पालकांचा दावा

दरम्यान मॅकडोनाल्डच्या कायदेशीर टीमने याबाबात सोमवारी एक निवेदन जाहीर केले. ज्यानुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मॅकडोनाल्डने निवेदनात हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. “अन्नाची सुरक्षा आणि गुणवत्तेसाठी उच्च दर्जाची खात्री देणे म्हणजे आम्ही प्रत्येक पदार्थ शिजविताना आणि ग्राहकांना देताना त्यांचे पालन करतो. या प्रकरणात आम्ही या सर्व धोरणांचे आणि कार्यपद्धतींचे पालन केले होते आणि म्हणून आम्ही या दाव्याशी आदरपूर्वक असहमत आहोत,” असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार एस्टेवेझ यांनी न्यायालयात सांगितले की, “अजूनही त्यांच्या मुलीच्या मांडीवर तो चटका बसलेला डाग आहे, त्याचा आता तिला काही त्रास होत नाही. कधीकधी ती त्या डागाचा उल्लेख ‘तिचा चिकन नगेट’ असा करते.”

न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये मुलीचे नाव कुठेही देण्यात आलेले नाही, तसेच या प्रकरणात ती साक्षदेखील देणार नाही.