मसाला डोसा आणि अंडा बुर्जी काही काळासाठी का होईना पण पोटाची भूक भागवण्यासाठी मुंबईकरांसाठी हे दोन पदार्थ पुरसे आहे. मुंबई असो की दिल्ली भारतातील गल्लोगल्ली डोसा आणि बुर्जीच्या गाड्या पाहायला मिळाल्या नाही तर नवलच! भारतीयांची हिच चव लक्षात घेऊन मॅकडॉनल्ड आता मसाला डोसा, अंडा बुर्जी अशा नाना चवींचे बर्गर आणण्याच्या तयारीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : सफरचंद सोलण्याची भन्नाट पद्धत

मॅकडॉनल्ड हे लहान मुलांत आणि तरुण वर्गात विशेष प्रसिद्ध आहे. ‘आय अॅम लव्हिंग इट्!’ ही जरी मॅकडीची टॅगलाईन असली तरी आता मॅकडीसाठी मुलांच्या आणि तरूणांच्या तोंडून हेच उच्चार निघतात. तेव्हा भारतीयांना अधिक आकर्षित करण्यासाठी मॅकडीने डोसा आणि बुर्जीच्या चवीत बर्गर आणण्याचे ठरवले आहे. हे नवीन चवीचे बर्गर सुरूवातील मुंबईतल्या आऊटलेट्समध्ये उपलब्ध होतील. सकाळच्या न्याहरीत अनेकांची डोसा किंवा बुर्जीला पसंती असते आणि मुंबईकरांच्या जीभेची हिच चव लक्षात घेऊन मॅकडी अशा वेगवेगळ्या चवीचे बर्गर आणणार आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने या संबंधीचे वृत्त दिले आहे. या दोन नव्या बर्गरव्यतिरिक्त मॅकडीमध्ये आणखी वेगवेगळे मेन्यू पाहायला मिळणार आहे. भारतीय ग्राहकांच्या चवी लक्षात घेऊन मॅकने याआधीही आलू टिक्की आणि चिकन टिक्की चवीचे बर्गर आपल्या मेन्यूमध्ये आणले होते. विशेष म्हणजे मॅकडीचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला होता.

असे भारतीय चव असलेले पदार्थ आपल्या यादीत सहभागी करून घेणारे मॅकडी हे काही पहिले नाही. केएफसीनेही भारतीय ग्राहकांच्या चवी लक्षात घेऊन आपल्या पदार्थांमध्ये बदल केला होता. तर डॉमिनोजनेही भारतीय ग्राहकांसाठी असाच प्रयोग राबवला होता. नवरात्रीच्या काळात पिझ्झा विक्री क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या ५०० दुकानांमधून केवळ शाकाहारी पिझ्झाच देण्याचा निर्णय घेतला होता. नवरात्रीच्या काळात अनेक लोक मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाही. त्याचबरोबर अनेक लोक या काळात उपवास करतात, या सगळ्याचा विचार करून आणि भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याच्या हेतून कंपनीने हा निर्णय घेतला होता.