McDonalds Latest Advertisement : फास्ट फूडची सेवा देणारी कंपनी मॅकडोनाल्ड त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर आणत असते. सध्या अशाच एका ऑफरमुळे ग्राहक आनंदी झाले नाही तर नाराज झाले आहेत. मॅकडोनाल्डनी या नव्या १७९ रुपयांच्या ऑफरची माहिती सांगण्यासाठी एक नवी जाहीरात आणली आहे मात्र या जाहिरातीवरुन मॅकडोनाल्डला चांगलेच ट्रोल केले जात आहे.
या जाहिरातीत एक ग्राहक मॅकडोनाल्डमधील एका महिला स्टाफला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ही छोटी लव्हस्टोरी नेटकऱ्यांना आवडली नाही.
काय आहे या जाहिरातीमध्ये?
या जाहिरातीत तुम्हाला दिसेल की एक ग्राहक (तरुण मुलगा) मॅकडोनाल्डमध्ये जातो आणि तेथील महिला स्टाफला मॅकवेगी मील्स ऑर्डर करण्यास सांगतो तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहून स्माइल देतात. मॅकवेगी मील्स मिळाल्यानंतर जेव्हा ग्राहक फूड खात असतो तेव्हा तो त्या महिला स्टाफकडे बघतो आणि तिला इशारे करतो.
त्यानंतर तो पुन्हा ऑर्डर देण्यासाठी त्याच महिला स्टाफ समोरच्या काउंटर रांगेत उभा राहतो तेव्हा बाजूच्या काउंटरवर असणारा पुरुष कर्मचारी त्याला त्याच्याकडे ऑर्डर देण्यास बोलावतो मात्र तो त्याला नकार देतो आणि त्याच रांगेत उभा राहतो. हे पाहून महिला कर्मचारी हसते आणि अॅड येथेच संपते त्यानंतर स्क्रिनवर लिहले जाते की ”DATE…SORT FOR @179”
हेही वाचा : अंघोळ करताना गाणं गायलं म्हणून होस्टेलच्या विद्यार्थीनीला शिक्षा, विचित्र घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का
मॅकडोनाल्डचे ट्विट चर्चेत
ही जाहिरात मॅकडोनाल्डने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” कधी कधी खूप मोठी प्रेमकहाणी ही खूप छोट्या गोष्टींपासून सुरू होते. एक नजर, एक हास्य आणि एक मील. आपल्या जवळच्या मॅकडोनाल्डमध्ये जा आणि १७९ रुपयांमध्ये मॅकवेजमील घ्या.” सध्या हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
हेही वाचा : गौतमी पाटीलचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात, “टीका करण्यासारखं नाचणं….”
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जाहिरातीवर संताप व्यक्त केला. नेटकऱ्यांनी थेट जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले, “ही खूप मुर्ख आणि विचित्र जाहिरात आहे.” तर दुसरा यूजर लिहितो, “ही जाहिरात ग्राहकांना कर्मचाऱ्यासोबत फ्लर्ट करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.” तर अन्य एक यूजर लिहितो, “या जाहिरातीमुळे तुम्ही महिला कर्मचाऱ्यासाठी असुरक्षित वर्कप्लेस बनवित आहात.”