‘एमडीएच मसाले’ हा भारतातील मसाल्यांचा एक प्रसिद्ध ब्रॅंड आहे. गेली कित्येक वर्ष आपण एमडीएच मसाल्यांच्या जाहिराती पाहत आहोत. या बरोबरच या ब्रॅंडचा चेहरा असलेले महाशय धर्मपाल गुलाटी हेही तिथेच प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते ‘एमडीएच अंकल’, ‘दादाजी’, ‘मसाला किंग’ आणि ‘किंग ऑफ स्पाइस’ या नावांनी देखील ओळखले जायचे. धर्मपाल गुलाटी यांनी या व्यवसायाची सुरुवात एक लहानशा दुकानातून केली आणि यानंतर त्याचे एका मोठ्या ब्रॅंडमध्ये रूपांतर केले.

आज ‘एमडीएच मसाले’ यशाच्या शिखरावर असून हा भारतातील ब्रँडेड मसाल्यांच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि विक्रेत्यांपैकी एक आहे. या प्रवासात धर्मपाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या मसाल्यांच्या जाहिरातींमधून ते भारतातील घराघरात पोहोचले. मात्र, त्यांच्या निधनानंतर या ब्रॅंडचा वारसा पुढे घेऊन जाणे ही कंपनीसमोरील एक मोठी समस्या होती. तसेच, ब्रँडच्या जाहिरातींमध्ये धर्मपाल गुलाटी यांची जागा कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न होता.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
anand teltumbde s new book Iconoclast on babasaheb ambedkar biography
लेख : आज आंबेडकरांचे विचार निरखताना…
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

आता हा पेच सुटला आहे. नव्या जाहिरातींमध्ये एका व्यक्तीने गुलाटी यांची जागा घेतली असून ही व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. तर, या नव्या जाहिरातींमध्ये दिसणारा ही व्यक्ती इतर कोणीही नसून धर्मपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आहेत. धर्मपाल गुलाटी यांच्या निधनानंतर राजीव गुलाटी यांनी ‘एमडीएच मसाले’ ही कंपनी ताब्यात घेतली आहे. राजीव यांना एमडीएचला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे श्रेय देण्यात आले आहे. सध्या ही कंपनी अमेरिका, कॅनडा, युरोप, युनायटेड किंगडम, दक्षिण-पूर्व आशिया, जपान, सौदी अरब येथे निर्यात करत असून शारजाहमध्ये कंपनीचे एक उत्पादन युनिट आहे.

नाणेघाटातील उलट दिशेने वाहणारा धबधबा देशभरात ठरतोय चर्चेचा विषय; Viral Video तुम्ही पाहिला का?

धर्मपाल गुलाटी यांच्या निधनानंतर, एमडीएच कंपनी विकण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, राजीव गुलाटी यांनी ही बातमी खोटी आणि बनावट असल्याच म्हटलं आहे. ते म्हणतात, ‘ही बातमी निराधार असून एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड हा आमचा वारसा आहे. महाशय चुन्नीलाल आणि महाशय धरमपाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च करून ही कंपनी उभारली आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.’

महिला पत्रकाराने कॅमेरासमोरच तरुणाला लगावली कानाखाली, नेमकं असं काय घडलं? पाहा Viral Video

दरम्यान, एमडीएचने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलेल्या संदेशात, या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. आता राजीव आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवणार असून, कंपनीच्या आगामी जाहिरातींमध्ये ते धर्मपाल गुलाटी यांच्या जागी दिसणार आहेत.

Story img Loader