Meerut Merchant Navy Officer Case : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करून पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवले होते. या प्रकरणात पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे. दरम्यान आता सौरवचा मुस्कानसोबतचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुस्कान तिचा पती आणि मुलीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये आनंदाने नाचत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नसली तरी तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ती आपल्या नवऱ्यासोबत डान्स करताना दिसतेय. लक्षवेधी बाब म्हणजे या डान्सनंतर ३ दिवसांनी तिने आपल्या नवऱ्याची हत्या केली. त्यामुळे हा व्हायरल व्हिडीओ पाहून देशभरातील नेटकरी खवळले आहेत. दरम्यान हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ सौरभ आणि मुस्कान यांची मुलगी पिहू हिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

मुलीच्या वाढदिवसाला सौरभनं पत्नीसोबत मनसोक्त डान्स केला होता. आई-वडिलांना एकत्र नाचताना पाहून मुलगी देखील खूप खुश होती. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे तो डान्स शेवटचा ठरला. कारण यानंतर मुस्काननं बॉयफ्रेंडसोबत मिळून सौरवची हत्या केली.

माहितीनुसार, सौरभ राजपूत नुकताच लंडनवरून भारतात आला होता. २०१६ रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. मेरठमध्ये हे जोडपे राहत होते. या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित सौरभ राजपूतची पत्नी मुस्कानला तिचा प्रियकर साहिल शुक्लाने व्यसनी बनवलं होतं. गांजा आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे ती प्रियकराला सोडू शकत नव्हती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक भास्करच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

आता मुस्कान रस्तोगीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिला जगण्याचा काहीही अधिकार नसून तिला फासावर लटकवा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रमोद कुमार रस्तोगी आणि कविता रस्तोगी यांनी दिली आहे. पालकांनी आपल्या मुलीला पाठिंबा देण्यास नकार दिला. आमचा जावई सौरभने मुस्कानवर मनापासून प्रेम केले. पण तिने त्याच्या प्रेमाची पर्वा केली नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Story img Loader