पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी धबधबे किंवा धरण अशा ठिकाणांना लोक भेट देतात. पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. लोणावळ्यातील भुशी धरण येथे वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील जण वाहून गेल्याची घटना गेल्याच आठवड्यात घडली. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेटचे व्हिडीओ व्हायरल झाले. तरीही जीव धोक्यात टाकून लोणवळ्याच्या भुशी धरणावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र अद्याप कमी झालेली नाही. दरम्यान सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे.
वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी शनिवार -रविवारी धबधबे, धरण आणि निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून भेट देतात पण अशा ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या इतकी वाढली आहे की पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहातात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंहगडावर आणि ताम्हिणी घाटात वाहनांच्या रांगा लागल्याचा व्हिडीओ चर्चेत आला होता. दरम्यान सध्या लोणवळ्यातील भुशी धरण येथील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एक्सवर @jayant_rokade नावाच्या खात्यावरून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ लोणावळ्यातील भुशी धरण येथील असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. एवढंच नाही तर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसत आहे. चेंगरा-चेंगरी सदृश्य परिस्थिती झाली आहे. व्हिडीओ पाहून लोकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हिडीओ ५ जुलै रोजी पोस्ट केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये,”सुट्टीच्या शनिवारी-रविवारी लोणावळ्याच्या भुशी डॅमला जाण्याआधी हा व्हिडीओ पाहा. हे लोक बुडून नाही मेले तरी गर्दीत चेंगरून मरतील अशी परिस्थिती आहे” व्हिडीओवर कमेंट करताना काही लोकांनी व्हिडीओ जुना असून पुन्हा व्हायरल झाल्याचा दावा केला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले, “लोक मरतील पण सुधरणार नाहीत”
हेही वाचा – प्रत्येकवेळी कोणी जीव वाचवायला येणार नाही! नशीबवान होती महिला, मदतीला धावून आले लोक; पाहा थरारक VIDEO
लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स, टायगर पॉईंटवर जायचंय?
लोणावळ्यातील भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी जाण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे आहे. सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यानच पर्यटकांना तिथे जाण्याची मुभा आहे. पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. जिल्ह्याधिकारी यांच्या या निर्णयाचे पर्यटकांनी स्वागत केलं आहे. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचं पर्यटकांनी म्हटलं आहे.