Success Story Of IAS Taskeen Khan: यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेत(CSE) उतीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रचंड मेहनत करण्याची आवश्यकता असते. कारण या परीक्षेसाठी लाखो लोक तयारी करत असता आणि त्यापैकी सर्वांच्या पदरामध्ये यश मिळत नाही. पण असे काही लोक असतात जे वारंवार अपयशाचा सामाना करूनही हार मान्य करत नाही आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहातात आणि अखेर त्यांना यश मिळते. अशाच एका व्यक्तीबद्दल आज जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही यशोगाथा आहे मॉडेलिंग इंडस्ट्रीत यशस्वी करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तस्किन खानची. अनेक प्रयत्नानंतरही जिने अपयश पाहिले आणि तरीही हार न मानता ती प्रयत्न करत राहिली. अखेर तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी झाली. IAS अधिकारी तस्किन खान या माजी मिस डेहराडून आणि मिस उत्तराखंड देखील होती.

हेही वाचा – अविश्वसनीय! चक्क समुद्रात हरवलेले पाकीट ८ महिन्यांनी सापडले! महिलेची पोस्ट चर्चेत

मॉडेलिंग सोडून UPSC परीक्षेचा निवडला मार्ग

IAS तस्किन खानने मॉडेलिंगमध्ये स्वत:चे चांगले नाव कमावले होते. एकेकाळी ती मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहिले होते पण तिने ते सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा मार्ग निवडला. तस्किन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत तीनदा नापास झाली, पण तिने हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.

हेही वाचा – “मैत्री असावी तर अशी!” रिक्षाचालकाबरोबर दिवसभर सैर करतोय कुत्रा; बंगळुरुमधील रिक्षाचालकाचा Video Viral

अभ्यासामध्ये फार हुशार नव्हती तस्कीन
मिळालेल्या माहितीनुसार, IAS अधिकारी तस्किन खान हिला मॉडेल व्हायचे होते पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे असे करता आले नाही. त्यानंतर तिने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ती अभ्यासात फार हुशार नव्हती पण योग्य पद्धतीने तयारी करण्याचे महत्त्व तिला माहित होते. तिने तिचा संपूर्ण वेळ तयारी करण्यासाठी वापरला. अखेर प्रमाणिक प्रयत्नाना यश मिळाले आणि चौथ्यावेळी ती युपीएससी परीक्षेत पास झाली.

हेही वाचा – “पोटासाठी काही पण..!” डोक्यावर केळ्याचं मुकुट, गळ्यात संत्र्याचा हार घालून रस्त्यावरील फळ विक्रेत्याचा Video Viral

ब्यूटी विद ब्रेन
IAS तस्किन खान केवळ सुंदरच नाही तर हुशारही आहे. महिला अधिकारी देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, येथेही मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलो करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet former beauty queen who quit miss india dream to become ias officer cracked upsc snk