“हे राजाचे जग आहे, आपण फक्त त्यात जगत आहोत,” बीबीसी अर्थने शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हे नाकारू शकणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती रस्त्यावर गाड्या अडवून चक्क टॅक्स वसूल करत आहे. हा व्हिडिओ श्रीलंकेतील असून या हत्तीचे नाव राजा असे आहे. या ‘राजा’ने स्वत:ला स्थानिक टोल कलेक्टर म्हणून नियुक्त केले आह आणि रस्त्यावर टॅक्स वसूलीच्या संकल्पनेला अनपेक्षित वळण दिले आहे.

महामार्गावरील एका टोल बूथवर लहान केबिनमध्ये कर्मचाऱ्यांकडून टोल वसूली केली जाते. श्रीलंकन हत्ती राजा स्वत:च्या मर्जीने टोल वसूली सुरू केली आहे. सिलोनमधील रस्त्याच्या कडेला उभा असलेला, तो आत्मविश्वासाने जात असलेल्या वाहनांजवळ जातो आणि त्याच्या शक्तिशाली सोंडेचा वापर करून चालक आणि प्रवाशांना अडवतो. ही त्याची विनंती आहे असे समजा. राजा हक्काने प्रवाशांकडून अन्न किंवा खाण्याचे पदार्थ घेतो. अखेरीस, प्रवासी देखील त्याला काही ना काही खायला देतात.

NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, लुनुगामवेहेरा ते सेल्ला कटारगामा असा प्रवास करणारे लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर केळीसारखी फळे घेण्यासाठी थांबतात, जेणेकरून राजा आणि त्याच्या सहकारी हत्ती मित्रांबरोबर रस्ता भेटल्यावर त्याला खायला देता येईल.

हेही वाचा – विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

२४ तासांत १६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओ ऑनलाइन वणव्यासारखा पसरला. कमेंट विभागात कमेंटसा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – “ये रातें ये मौसम!”, सनम पुरीच्या गाण्यावर चिमुकलीने सादर केला सुंदर डान्स, Viral Video पाहून तिच्या प्रेमात पडाल

एका यूजरने लिहिले की, “रस्ता त्याच्या हक्काच्या जमिनीतून बनवला जातो, त्याला कर वसूल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.” दुसरा वापरकर्ता म्हणाला, “आता प्राण्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार सुरू झाला आहे.”

तिसऱ्या व्यक्तीने लिहिले, “हे हत्ती खरे व्यापारी आहेत.” चौथ्या व्यक्तीने टिप्पणी केली, “GST = गजराज सेवा कर.” दुसऱ्या युजरने लिहिले, “माझा कर कुठे आणि कसा भरावा अशी माझी इच्छा आहे.”

Story img Loader