Success story: कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणतात. पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन काम केलं तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतं. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्‍यक्‍तीबद्दल सांगणार आहोत, ज्याला एकेकाळी जेवण मिळायचं नाही, तोच आता ४०० गाड्यांचा मालक आहे. आज तिच व्यक्ती देशातच नाही, तर परदेशातही प्रसिद्ध आहे.आज ती व्यक्ती कोट्यधीश आहे. आम्ही सांगत आहोत तो म्हणजे बंगळुरुमध्ये एक असा केस कापणारा न्हावी आहे ज्याच्याकडे तब्बल ४०० गाड्या आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊया…संबंधित वृत्त DNA संकेतस्थळाने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी पेपर टाकणारा आज ४०० गाड्यांचा मालक

रमेश बाबूचे वडील न्हावी होते ज्यांचे रमेश बाबू अवघ्या ७ वर्षांचे असताना निधन झाले. रमेश बारावीत नापास झाले. परिस्थितीही नाजूक असल्यामुळे त्यांनी अवघ्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर रमेश बाबूने वृत्तपत्र विकण्यासह वेगवेगळ्या नोकऱ्या करून कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. एक वेळ अशीही होती जेव्हा रमेश बाबूच्या कुटुंबाला एकावेळेचं अन्न मिळत नव्हतं. त्यानंतर रमेश बाबू यांनी १९९० च्या दशकात सलूनचा व्यवसाय सुरू केला आणि काहीच दिवसात त्यांना चांगले पैसे मिळू लागले. आज रमेश यांचं नाव श्रीमंत न्हाव्यांपैकी एक आहे. आज ते ३.५ कोटींच्या कारमधून सलूनमध्ये येतात. रमेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. याशिवाय त्यांना आलिशान घरांचाही शॉक आहे. त्यांचा कार भाड्यानं द्यायचा व्यवसायही आहे.

भाड्याने लक्झरी कार उपलब्ध करून देणारा पहिला व्यावसायीक

त्यांच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये त्यांनी हळू हळू वेगवेगळ्या व्यावसायांमध्ये गुंतवणूक सुरु केली. रमेश बाबूंनी पैसे वाचवायला सुरुवात केली आणि भाड्याने वाहन म्हणून वापरण्यासाठी मारुती ओम्नी कार खरेदी केली. त्यानंतर रमेश बाबूंनी रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कार भाड्याने देणे आणि सेल्फ-ड्राइव्ह उपक्रम सुरू केला. काही महिन्यांनंतर, त्यांनी मर्सिडीज ई क्लास सेडान विकत घेतली आणि भाड्याने लक्झरी कार उपलब्ध करून देणारा शहरातील पहिले व्यक्ती बनले.

हेही वाचा >> शाब्बास पोरी! मातृभाषेत शिक्षण, मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशीप अन् आता ५० लाखांचं पॅकेज

सचिन तेंडुलकरपासून अमिताभ बच्चन यांनीही कार सेवा वापरली

त्यानंतर रमेश बाबूंनी ३ कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट कार, तसेच बीएमडब्ल्यू, जग्वार्स आणि बेंटले लक्झरी सेडान सारखी इतर वाहने खरेदी केली. २०१७ मध्ये, रमेश बाबूंनी २.७ कोटी रुपयांची Maybach S600 खरेदी केली तेव्हा ते चर्चेत आले. रमेश बाबूंच्या म्हणण्यानुसार, ज्या सेलिब्रिटींनी त्यांची कार सेवा वापरली आहे त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आणि आमिर खान यांसारखे प्रसिद्ध अभिनेते आणि सचिन तेंडुलकरसारखे क्रीडा स्टार यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet ramesh babu the billionaire barber who owns 400 luxury cars once sold newspapers slept hungry srk
Show comments