मालवाहू किंवा जड वाहनांवर सर्वसाधारण पुरूष ड्रायव्हर पहायला मिळतात. पण जापानमधील एका २१ वर्षीय तरूणीने वडिलांसाठी ट्रक ड्राइव्हर होण्याचा निर्णय घेतला. Rino Sasaki असं त्या तरूणीचं नाव असून ती सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. राइनोच्या अनेकांना कौतुक वाटतं की, इतकी सुंदर तरूणी ट्रक चालवते.
राइनोचे वडील व्यावसायाने ट्रक ड्रायव्हर आहेत. जेव्हा राइनो सात वर्षांची होती तेव्हापासून तिच्या वडिलांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. पण पोटाची खळगी भरण्यासाठी राइनोच्या वडिलांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे ते ट्रक चालवायचे. वयाच्या सातव्या वर्षांपासून राइनोही वडिलांसोबत जायची.
View this post on Instagram
घरापासून शेकडो किलोमीटर दूर रस्त्यावर बाप आणि मुलगी एकमेकांना आधार ठरत होते. राइनोनं मोठं झाल्यानंतर नृत्य शिक्षक म्हणून काम सुरू केलं. २१ वर्षाची झाल्यानंर राइनोला वाहन चालक परवाना मिळाला. त्यानंतर तिने वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. राइनोने नृत्य शिक्षकाचे काम सोडून ट्रक चालवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला राइनो ट्रकही चालवायची आणि नृत्य शिक्षक म्हणून काम पहायची. पण सध्या राइनो पूर्णवेळ ट्रक ड्राव्हर आहे. आणि याचा राइनोला कोणताही पश्चाताप नाहीये. ट्रक चालवण्यामुळे मला माझ्या वडिलांसोबत जास्तीत वेळ घालवता येतोय असे तिचे मत आहे.
View this post on Instagram
जापानमधील फळ-भाज्या घेऊन जाणाऱ्या ट्रकवर राइनो ड्राइव्हर आहे. वर्षाला साधारणपणे ती २००,००० किलोमीटर ट्रक चालवते. इतकेच नाही तर कधी ट्रकमध्ये काही बिघाड झाल्यास ती स्वत; दुरूस्तीही करते. सोशल मीडियावर राइनोची सतत चर्चा असते. सोशल मीडियात लोक राइनोला जापानची सर्वात सुंदर ट्रक ड्रायव्हर म्हणतात. मला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे जपानमधील इतरही महिलांना ट्रक ड्रायव्हिंग करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे मत राइनोचे आहे.
View this post on Instagram