. “प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे… कृपया लक्ष द्या! १-०-१-१-१ डाउन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस थोड्याच वेळात फलाट क्रमांक एकवर येत आहे” अशी घोषणा रेल्वे स्थानकावर कोणत्याही ट्रेनची वाट पाहताना नेहमी कानावर पडतो.
हा ओळखीचा आवाज आपण अनेकदा ऐकला आहे पण त्या आवाजाच्या मागे कोण आहे याचा कधी विचार केला आहे का? तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल हा महिलेचा आवाज चक्का एका मुलाचा आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याने एकदा रेल्वेसाठी आवाज दिला आणि आता त्याचा आवाज भारतीय रेल्वेचा आयकॉनिक आवाज म्हणून ओळखला जातो.. आवश्यकतेनुसार वाक्ये तयार करण्यासाठी अदोडेचे व्हॉइस रेकॉर्डिंग डिजिटली मिसळून आता भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सामान्य घोषणा करत आहेत.

हेही वाचा – ‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral

“मी लहानपणापासूनच रेल्वेचा चाहता होतो आणि विशेषत: ट्रेनच्या घोषणांनी मला नेहमीच भुरळ घातली होती. त्यामुळेच मी घोषणांकडे लक्ष वेधले होते. परळी वैजनाथ येथे राहून मी भारतीय रेल्वेमध्ये खाजगी कर्मचारी म्हणून रुजू झालो होतो. बहुतेक रेल्वे स्थानकांवर, संगणकावर प्री रेकॉर्डेड आवाज ऐकू येतो. एक दिवशी दिवशी लोडशेडिंगमुळे ऐकू येत नव्हता आणि त्यावेळी घोषणा करण्यासाठी प्रत्यक्षात एका आवाजाची आवश्यकता होती आणि तिथेच मला पहिली संधी मिळाली,” असे अदोडे यांनी मिड-डेला सांगितले.

हेही वाचा- ‘कॉलर पकडली, केस ओढले…ग्राहकाने थेट बँक कर्मचाऱ्याला केली मारहाण, Video होतोय Viral

“मला ते वापरात असलेल्या अशाच आवाजात काम करायचे होते आणि तो आवाज सरला चौधरी या महिलेचा होता. मी तसाच आवाजाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि माझा आवाज अगदी जुळून आला. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. मला माझ्या कामाचा अभिमान आहे आणि जसजशी मला संधी मिळत राहिली , तसतशी मी घोषणा करत राहिलो,” असे तो पुढे म्हणाला.

“माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता जेव्हा मुंबई सीएसएमटी येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील वरिष्ठ उद्घोषकांनी माझ्या आवाजाबद्दल माझे अभिनंदन केले आणि मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी हा सर्वोच्च पुरस्कार होता,” तो म्हणाला.

आज अनेक रेल्वे स्थानकांवर महिलांच्या आवाजातील श्रवणचे रेकॉर्डिंग ऐकू येते.

“आज मी जे काही करतो त्याचा मला अभिमान आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तेव्हा काही विद्यार्थी होते जे माझ्या आवाजाच्या कौशल्यामुळे मला अपमानित करायचे आणि चेष्टा करायचे. ते मला नावाने हाक मारायचे आणि टोमणे मारायचे. मी फक्त दुर्लक्ष करायचो. पण आज मी लाखो प्रवाशांना मार्गदर्शन करत आहे,” श्रवण म्हणाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet shravan adode railways man who announces in womans voice snk