Siddharth Nandyala Developed An AI Powered App Called CircadiaV : बदलती जीवनशैली, चुकीची आहारपद्धती यांमुळे हृदयरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशातच १४ वर्षीय एनआरआयच्या भारतीय विद्यार्थी सिद्धार्थ नंद्यालाने ‘सर्काडियाव्ही’ (CircadiaV) नावाचे एआय-चालित ॲप विकसित केले आहे, जे फक्त सात सेकंदात हृदयरोग ओळखण्यास मदत करू शकते. त्याच्या या नवीन एआय-चालित ॲपमुळे प्रभावित होऊन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सिद्धार्थला ॲप आणि त्याच्या ॲपमधील फीचर्सच्या चर्चेसाठी त्यांच्या कार्यालयात आमंत्रित केले.
सिद्धार्थचे वडील महेश मूळचे अनंतपूरचे आहेत. पण, २०१० मध्ये ते अमेरिकेतसुद्धा गेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या भेटीदरम्यान महेश आणि सिद्धार्थबरोबर आरोग्य मंत्री सत्य कुमार यादव होते. लिंक्डइन प्रोफाइलनुसार, सिद्धार्थने एक तरुण तंत्रज्ञान उद्योजक म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल सांगितले आहे. तो STEM शिक्षणाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या STEM IT या उपक्रमाचा संस्थापक आणि CEO आहे. STEM IT द्वारे तो विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स, एआयचे ज्ञान देतो आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रेरित करतो.
लवकरच हृदयरोगाच्या समस्यांमध्ये क्रांती घडवून आणणार
तर सिद्धार्थ नंद्यालाबद्दल कौतुक करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘या १४ वर्षांच्या मुलाने हृदयाशी संबंधित समस्या ओळखणे सोपे केले आहे! सिद्धार्थ नंदयाला, डलास येथील एक तरुण एआय विषयासाठी उत्साही आणि ओरेकल आणि एआरएम दोन्हीकडून प्रमाणपत्रे धारण करणारा जगातील सर्वात तरुण एआय-प्रमाणित व्यावसायिक आहे, त्याला भेटून मला खूप आनंद झाला आहे’, अशी कॅप्शन दिली आहे.
सिद्धार्थचे ॲप, सर्केडियन एआय (Circadian AI) हे एक वैद्यकीय यश आहे, जे काही सेकंदात हृदयाशी संबंधित समस्या शोधू शकते. सर्केडियन एआय, स्मार्टफोन आधारित हृदय ध्वनी रेकॉर्डिंग वापरून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाच्या सुरुवातीच्या तपासणीत क्रांती घडवून आणू शकते. ९६ टक्के प्लस अचूकतेसह त्याच्या तंत्रज्ञानाची अमेरिकेतील १५,००० हून अधिक रुग्णांवर आणि जीजीएच गुंटूरसह भारतातील ७०० रुग्णांवर चाचणी घेण्यात आली आहे.
सिद्धार्थची असाधारण प्रतिभा आणि मानवजातीच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या समर्पणाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू खूप प्रभावित झालो आहेत. इतक्या लहान वयात तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरतो आहे. आरोग्यसेवा तंत्रज्ञानाबद्दलची त्याची आवड जोपासण्यासाठी मी त्याला मनापासून प्रोत्साहित करतो आणि त्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये आमचा पूर्ण पाठिंबा राहील याची खात्री देतो; असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले आहेत.