Leaf Sheep Slug Video : समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक जीव असतात. प्रत्येक जीवाची वेगळी खासियत असते; पण यातील काही जीव आपण यापूर्वी कधी पाहिलेलेही नसतात. असे अद्भुत जीव पाहताना अनेकदा अवाक् व्हायला होते. सध्या समुद्रातील अशाच एका अद्भुत जीवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जीव पाहून अनेकांना पोकेमॉन कार्टून आठवले. कारण- अगदी पोकेमॉन कार्टूनच्या चेहऱ्याप्रमाणेच या जीवाचा चेहरा दिसतेय. लीफ शीप स्लग, असे या समुद्री जीवाचे नाव आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय.

अनेकांनी हा छोटासा जीव खूपच गोंडस असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याची खासियत जाणून घेतल्यानंतर लोक त्याला जवळून पाहण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. त्याला ‘कोस्टासिएला कुरोशिमा’ असेही म्हणतात.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

जपानमधील ‘कुरोशिमा’ बेटावर हे ‘लीफ शीप’ आढळतात. १९९३ मध्ये तो प्रथमच तिथे आढळून आला. हा जगातील एकमेव सागरी जीव असा आहे; जो वनस्पतींप्रमाणे प्रकाशसंश्लेषण करू शकतो. त्याचे सर्वांत आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांसारख्या कळपात चरण्याची पद्धत आणि त्याच्या पाठीवर पानांच्या ढिगाचा आकार आहे. त्यामुळे त्याला ‘लीफ शीप’ असे म्हणतात. हे जीव प्रामुख्याने जपानच्या आसपासच्या स्वच्छ पाण्यात आढळतात.

घराबाहेरील तुळशीचं रोप वारंवार सुकतयं? करा ‘हे’ ४ उपाय, तुळस नेहमी दिसेल हिरवीगार

‘sociaty’ नावाच्या पेजने त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ही लहान समुद्री स्लग; जी ‘लीफ शीप’ म्हणून ओळखली जाते. ही ‘सॅकोग्लोसन’ या समुद्री स्लगची एक प्रजाती आहे; ज्यामध्ये प्रकाशसंश्लेषण करण्याची असामान्य क्षमता आहे. हे जीव एकपेशीय वनस्पती खातात; ज्यामुळे त्यांना त्यांचा विशिष्ट रंग मिळतो आणि त्यांना त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यास मदत होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कळपांमध्ये पुढे जाऊन, त्यांना मोठ्या भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करणे आणि अन्न शोधणे सोपे होते.

लोक ‘लीफ शीप’ हा निसर्गातील सर्वांत सुंदर जीव असल्याचे म्हणत आहेत. या व्हिडीओवर आता युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिलेय, “त्याच्या गालावर पिंक हार्टचा छोटा आकार आहे; जे पाहताना खूप छान, गोंडस दिसतंय.” दुसऱ्या युजरने, “मी त्या स्लगला पाळू शकतो का”, असा प्रश्न केला आहे. त्यावर आणखी एका युजरने लिहिलेय, “हे दोन काळे ठिपके त्याचे डोळे आहेत का? आणि ब्लश. हा पोकेमॉन आहे का?”