Flying Car Viral Video: तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांच्या मनात नेहमी एक विचार येत असतो, ‘काश….एवढ्यावेळ ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा उडत उडत आपल्याला हव्या त्या ठिकाणी जात आले असते तर?” जरा विचार करा ही कल्पना जर सत्यात उतरली तर? ट्रॅफिकमध्ये अडकलेली कार अचानक हवेमध्ये उडताना दिसेल. सध्या असाच एका व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावर धावणारी कार अचानक हवेत उडताना दिसत आहे. ही आश्चर्यकारक कामगिरी अमेरिकेतील असल्याचे समजते, टेक्नॉलॉजीच्या मदतीने अशी कमाल केली आहे जी पाहून लोकांना धक्का बसत आहे.
बदलत्या काळानुसार बरेच काही बदलत आहेत. तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या काळात आज आयुष्य जगणे सहज आणि सोपे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे आज आश्चर्यकारक उपकरणांची निर्मिती केली जाते जे पाहून कित्येक लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जगभरात आज मनुष्य तंत्रज्ञानवर अवलंबून आहे. याच कारणामुळे वेळोवेळी आश्चर्यकारक गोष्टींचा निर्माण केला जातो.
अमेरिकेतील कंपनीने तयार केली हवेत उडणारी कार
सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका चित्रपटातील सीन प्रमाणे एक गाडी हवेत उडताना दिसत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून या हवेत उडाणाऱ्या कारला Alef Aeronautics या कंपनीने तयार केले आहे. ३० जूनला कंपनीने घोषणा केली होती की त्यांनी यूएस फेडरल एव्हिशेन अॅडमिनिस्ट्रेशनकडून (एफएए)स्पेशल एअरवर्थनेस सर्टिफिकेशन मिळाले आहे ज्याचा अर्थ, कायदेशीररित्या कंपनीने तयार केलेली इलेक्ट्रीक कार अमेरिकेत हवेत उडवू शकते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ टेस्टिंगचा आहे.
हेही वाचा – आता बातम्या सांगणार AI न्युज अँकर! ओडीसाच्या खासगी चॅनलने लॉन्च केली व्हर्च्युअल अँकर ‘लिसा’; पाहा व्हिडीओ
हेही वाचा – चौथी मांजर कुठे आहे? तुम्ही खरचं Cat Lover असाल तर ५ सेंकदात सांगा उत्तर
टेस्टिंगचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्याला खूप पसंती मिळत आहे. ३७ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची कार आधी रस्त्यावर आणि मग हवेत उडताना दिसत आहे. ५ जुलैला हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आतापर्यंत २ मिलियनपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे.