आपल्या अजस्त्र आकारामुळे चंढीगढचा वळू सेलिब्रिटी झाला आहे. मुर्रा प्रजातीच्या हा वळू जगातील सगळ्यात महागडा वळू मानला जातो कारण आतापर्यंत त्याच्यावर ७ ते ९ कोटींच्या आसापास बोली लावली गेली आहे. पण इतकी प्रचंड बोली लावूनही त्याच्या मालकाने मात्र त्याला न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्याच आठवड्यात राजस्थानमध्ये पार पडलेल्या कृषी उन्नती पशू मेळाव्यात आलेल्या युवराज हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनला. यावेळी युवराजवर तब्बल ९ कोटींच्या आसपास बोली लावली गेल्याची चर्चा आहे. हरियाणाच्या कर्मवीर सिंह यांच्या मालकीचा हा वळू आहे. याची प्रसिद्धी इतकी आहे की त्याच्यावर एका चॅनेलने माहितीपटही तयार केला होता. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण या वळूला पाहण्यासाठी देशभरातून लोक कर्मवीर यांच्या घरी येतात. सुमारे १५०० किलो वजन आणि साडेसहा फूट उंच असलेल्या युवराजचा कर्मवीर आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करतात. रंगीबेरंगी झुल पांघरून जेव्हा युवराज रस्त्यावर फिरतो तेव्हा अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर होतो. आतापर्यंत त्याला खरेदी करण्यासाठी अनेकांनी कर्मवीरांना मोठी रक्कम देऊ केली पण कर्मवीरांनी मात्र नेहमीच पैसे धुडकावून लावले. कर्मवीर यांना या युवराज पासून वर्षाला ४५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते असेही त्यांनी सांगितले. युवराज पासून जन्मलेल्या म्हशी जास्त दूध घेतात, तसेच त्या सशक्त देखील असतात. तर वळू हे ताकदवान असून त्यांच्या शेतीसाठीही चांगला उपयोग होतो. म्हणून युवराज पासून जन्मलेल्या वासरांवर पाच ते सहा लाखांची बोली लावली जाते.

त्यामुळे लाखोंचे उत्पन्न मिळवून देणा-या युवराजची कर्मवीरही तितकीच काळजी घेतात. युवराजला चा-या ऐवजी १०० किलो सफरचंद, १५ किलो धान्य आणि सुवा मेक्याची खुराक दिली जाते असेही कर्मवीर यांनी सांगितले त्यामुळे त्याच्या दिवसांच्या खुराकेवर कर्मवीर सिंह हजारो रुपये खर्च करतात. इतकेच नाही तर राईच्या तेलाने त्याला मालिश देखील केले जाते अशीही माहिती कर्मवीर यांनी दिली. त्याची काळजी घेण्यासाठी १० जणांची नेमणुक करण्यात आली आहे म्हणूनच हा जगातील सगळ्यात महागडा वळू आहे पण आपण कधीही त्याला विकणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.