हेडिंग वाचून आणि हा ग्लॅमरस फोटो पाहून तुम्हाला धक्का बसला असेल ना? काहीतरी चुकतंय असं वाटतं असेल. फोटोमधली बाई तर चांगली तरणीताठी दिसतेय, कपडेही मॉडेलसारखे घातलेत मग हिला आजी म्हणून का लोक हाक मारत असतील? असा प्रश्न एव्हाना तुमच्याही डोक्यात आला असेल. आजी म्हटल्यावर साडी घालणारी, सुरकुतलेल्या चेह-यांची, पिकलेल्या केसांची, डोळ्यावर भिंगाचा चष्मा, उतारयवयामुळे किंचितशी वाकून किंवा काठीचा आधार घेऊन चालणारी एखादी वृद्ध स्त्री डोळ्यासमोर उभी राहते आणि ही तर चक्क वनपीसमध्ये आहे त्यामुळे तुमचाही गोंधळ उडाला असेल. पण ही महिला दोन नातवंडांची आजी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या आजीबाईंचं नाव आहे झकलिना. ४७ वर्षे वय असेलली आजी मुळची सर्बियाची पण सध्या फॅशनची नगरी इटलीत राहते. फॅशन ब्लॉगर म्हणून ती प्रसिद्ध आहे. या आजींचे इन्स्टाग्राम फॉलोअर्सही थोडेथोडके नाहीत तर चक्क १ लाख ५८ हजारांच्या आसपास आहेत. स्टाईलिश कपडे घालून वेगवेगेळ्या पोजमध्ये फोटो काढणे हा तर आजीबाईंना छंदच जणू. ‘ग्लॅमरस ग्रँडमदर’ म्हणून ती फॅशनविश्वात प्रसिद्ध आहे. आपल्याला दोन नातवंडं आहेत हेही आजी लपवून ठेवत नाही, त्यामुळे इन्स्टाग्रामवर फोटो टाकला की ‘ग्रँडमदर दॅट लव्हस फॅशन’ असा हॅशटॅग टाकायला ती विसरत नाही. आपल्या बरचश्या फोटोमध्ये ती तिच्या दोन नातींसोबत दिसते.

इकलिना ४७ वर्षांची आहे आणि दोन मुलांची आई देखील आहे. दुर्देवाने गेल्याचवर्षी तिच्या मुलाचे निधन झाले. तर दुस-या मुलीचे लग्न झाले आहे, मुळची सर्बियाची असलेली ही आजी युरोपचे फॅशन हब म्हणून ओळखल्या जाणा-या इटलीमध्ये वास्तव्यास आहे. रिअल फॅशनिस्टा अशी तिची आणखी एक ओळख आहे.