अनेक लोकांना राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते. आपण ज्या नेत्यांचे समर्थन करतो त्यांच्या घरचे लोक नेमके कसे राहतात आणि काय करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. शिवाय अनेक नेत्यांचे नातेवाईक जास्त माध्यमांसमोर येत नाहीत, त्यामुळे जर कधी ते लोकांना बाहेर दिसलेच, तर त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. अशातच ती व्यक्ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांची बहीण असेल तर? तर नक्कीच लोकांना त्यांना पाहण्याची दाट इच्छा असते आणि ती आता पूर्णदेखील झाली आहे. कारण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण बसंती बेन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण शशी देवी यांची भेट झाली आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण बसंती बेन पौराणिक नीलकंठ महादेव मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएम आणि सीएम यांच्या बहिणींची झाली भेट –

श्रावण महिन्यात नीलकंठ धाम येथे भगवान भोलेनाथांचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बहीण उत्तराखंडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी ब्रह्मपुरी येथील श्री राम तपस्थली आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी दयारामदास महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्या मुख्यमंत्री योगींच्या बहिणीची भेट घेण्यासाठी गेल्या.

हेही पाहा- फणा काढलेल्या नागाला गायीने प्रेमाने चाटलं अन्…, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला दुर्मिळ Video पाहून थक्कच व्हाल

दोघींच्या भेटीचा व्हिडीओ होतोय व्हायरल –

दोघींची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकींना मिठी मारली आणि घरच्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. पीएम मोदीं आणि सीएम योगी यांच्या बहीणींच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ लोक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, “२ बहिणी… एकीचा भाऊ पंतप्रधान, तर दुसरीचा मुख्यमंत्री, पीएम मोदींची बहीण बसंती बेन यांनी सीएम योगींची बहीण शशी देवी यांची नीलकंठमध्ये भेट झाली. दोघींनाही आपल्या भावांचा अभिमान आहे आणि दोघेही आपल्या भावांबद्दलच बोलत असतील?” तर या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिलं, “देशातील कोणत्याही नेत्याचे कुटुंब असे जीवन जगत आहे का? मोदीजी २ वेळा पंतप्रधान झाले आहेत पण त्यांनी कधीही कुटुंबातील सदस्यांना कोणताही राजकीय फायदा दिला नाही आणि योगीजींनीही तेच केलं आहे.” तर आणखी एखाने लिहिलं, “दोन कुटुंबांमध्ये किती साधेपणा आहे, आम्हाला आमच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा अभिमान आहे!” शिशिर नावाच्या वापरकर्त्याने लिहिलं, “योगीजींची बहीण कोणाशीही फोटो व्हिडिओ शूट करत नाही, पण जेव्हा पीएम मोदींच्या बहिणीचा प्रश्न येतो तेव्हा नकार देणे योग्य नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of sisters of prime minister narendra modi and chief minister yogi adityanath video went viral in uttarakhand trip jap
Show comments