मुख्यमंत्री आणि त्यांचे विरोधक एकाच व्यासपीठावर जर का चुकून दिसलेच की या दोघांमध्ये टोलवाटोली आणि आरोपप्रत्यारोप पाहायला मिळाले नाही तर नवलच. पक्षांच्या कामगीरीची उणीधुणी काढणे, टीका आणि आरोप करणे हे नेहमीचेच, त्यातून कधीतरी दाखवायला म्हणून एकमेकांवर खोटी स्तुतीसुमने उधळली जातात. पण मेघालयमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधक यांच्यामध्ये काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राजकारणात मुख्यमंत्री आणि त्यांच्या विरोधकांनी एकमेकांवर भले कितीही चिखलफेक केली असेल पण जेव्हा गोष्ट एकत्र मजा मस्ती करण्याची येते तेव्हा या दोघांनी राजकारण बाजूला ठेवून व्यासपीठावर अशी काही धमाल उडवून दिली की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही तर नवलच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : तब्बल १७ व्या अपत्यानंतर दाम्पत्याला सुचले कुटुंब नियोजनाचे शहाणपण

मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा आणि त्यांचे विरोधक डॉ. डोनकुपर रॉय, पॉल लिंगदोह यांची व्यासपीठावर संगितिक जुगलबंदी रंगली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांनी गायला सुरूवात केली अन् पॉल यांनी देखील त्यांना चांगलीच साथ दिली. संगमा यांच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडिओ असल्याचे समजते. त्यामुळे एरवी एकमेकांच्या विरोधात लढणा-या या दोन्ही नेत्यांची अशी सांगितिक जुगलबंदी पाहणे हे व-हाडी मंडळींसाठी भाग्यच ठरले. संगमा स्वत: एक उत्तम गायक आहेत. कॉलेजमध्ये असताना कॉलेज बँडमध्ये ते सक्रिय होते. तर लिंगदोह हे उत्तम कवी देखील आहेत. त्यामुळे कवी आणि गायकामध्ये रंगलेली जुगबंदी पाहायला मिळणे अनेकांसाठी पर्वणीच ठरली. या व्हिडिओला सोशल मीडियावर भरभरून प्रसिद्धी मिळत आहे.

वाचा : गणितात १०० पैकी १०० गुण मिळवणा-या आमदाराचे बिंग फुटले

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meghalaya cm mukul sangma sang classic beatles track with opposition leader