आरबीआय (RBI) अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल शुक्रवारी (१९ मे) रोजी मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. मात्र, नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा म्हणजे एकावेळी २० हजार रुपये बॅंकेत जमा करता येणार आहेत. आरबीआयने या निर्णयाची अमंलबजावणी करताच इंटरनेटवर नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडला आहे.

अनेकांनी तर २ हजार रुपयांच्या नोटांचा फोटो अपलोड करत भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलं आहे. तर अनेकांनी या नोटांमधील चीप काढून त्या जमा करायच्या की चीपसह जमा करायच्या असे भन्नाट प्रश्न विचारले आहेत. अनेकांनी तर बॉलिवूड ते हॉलिवूडच्या चित्रपटांमधील काही सीन एडीट करुन त्याची मीम्स तयार केली आहेत. जी पाहून अनेकांना आपलं हसू आवरण कठीण झालं आहे. चला तर नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून २ हजारांच्या नोटांना निरोप दिला आहे ते पाहूया.

mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Wildebeest animal brutally attacked by lion
‘एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं…’ वाइल्डबीस्ट प्राण्यावर सिंहाने केला क्रूर हल्ला; VIDEO पाहून फुटेल घाम
Dance Viral Video
‘याला म्हणतात अस्सल लावणी…’ चिमुकलीचा जबरदस्त ठुमका पाहून नेटकरीही झाले शॉक; VIDEO एकदा पाहाच…

एका व्यक्तीने दोन हजार रुपयांच्या नोटांना फुलांचा हार घातला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये RIP असं लिहिलं आहे.

हेही पाहा- बाईकवर बसायला जागा नाही म्हणून महिलेने केलं जबरदस्त जुगाड; व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

एका नेटकऱ्याने २००० रुपयांच्या नोटेवर खाण्याची चिप्स ठेवली असून त्याने आता या चीप्स असलेल्या नोटांना निरोप देत आहोत, तुमची खूप आठवण येईल असं लिहिलं आहे. महत्वाचं म्हणजे त्याने या नोटांचा कार्यकाल लिहिला आहे. तो (२०१६ ते २०२३) असा आहे.

हेही पाहा- मोलकरणीचे भयानक कारनामे; एका WhatsApp DP मुळे समोर आली ६० लांखाची चोरी, प्रकरण वाचून व्हाल थक्क

तर जयदेव जॉन नावाच्या युजरने काही लोक रडताना दाखवले आहेत. तर त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ज्यांच्या घरात २००० रुपयांच्या नोटा आहेत. त्यांची अवस्था अशी आहे.

अनिल नावाच्या व्यक्तीने आता तरी आम्ह सुरुवात केलेली, तोपर्यंत शेवट देखील झाला असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी अशीच काही मजेशीर मीम्स खाली पाहू शकता.

फोटो – सोशल मीडिया.

Story img Loader