तुम्ही कासव पाहिले असेल? आपल्या सुरक्षा कवचाचा भार पाठीवर घेऊन हळू हळू चालणारे कवच तुम्ही अनेकदा पाहिले असेल किंवा पाण्यात पाय मारून पोहणारे कासवही पाहिले असेल. कासवच्या पाठीवर असणारे हे कवच त्याच्या सुरुक्षेसाठी असते. जेव्हाही संकटाचा भास होतो तेव्हा कासव आपले पाय, शेपूट आणि तोंड कवचाच्या आत ओढून स्वत:चे संरक्षण करू शकतो. पण तुम्हाला माहितीये का जर कासव चूकूनही त्याच्या पाठीवर म्हणजेच उलटे झाले तर त्याला स्वत:हून सरळ होता येत नाही. अशावेळी तो स्वत:चे संरक्षण करू शकत नाही. अशाच एका दुर्गम समुद्रकिनाऱ्यावर वाळूत उलट्या पडलेले कासवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. उलटे झालेल्या कासवाला वाचवाणाऱ्या व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कासवाच्या मदतीला धावून आलेल्या या व्यक्तीचे कौतूक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये एका चिमुकल्यासह एक व्यक्ती दिसत आहे जेव्हा तो वाळूमध्ये उलटा पडलेल्या कासवाला पाहतो आणि लगेच त्याच्या मदतीला धावतो. आणखी एक माणूस मॉसच्या मदतीला येतो. ते कासवाच्या खालून थोडी वाळू हाताने बाजूला सरकवतात. मग ते कासवाला उचलून पुन्हा सरळ करतात आणि पाण्यात ढकलतात जिथे दुसरे कासव त्याची वाट पाहत असते.

हेही वाचा – Gulab Jamun Latte: तुम्ही कधी गुलाबजाम कॉफी प्यायली आहे का? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा

व्हिडिओ पहा:


इंस्टाग्रामवर गुड न्यूज मूव्हमेंटने नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आणि ब्रॉडी मॉस या प्रसिद्ध YouTuber ला व्हिडीओचे त्याने त्याचे श्रेय दिले आहे. “या दुर्गम आणि निर्जन बेटावर समुद्रांच्या लाटांचा सामना करताना अनेकदा कासव उलटे पडतात. भरतीच्या वेळी अशी घटना घडल्यास, भरती शेवटी समुद्राकडे जाऊन शांत होते पण कासव मात्र तसेच उलटे अडकून राहते, असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत १.५ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले आहे. कासवाला मदत केल्याबद्दल नेटिझन्सनी त्या माणसाचे कौतुक केले, तर काहींना आश्चर्य वाटले की, “ते कॅमेर्‍यासाठी घडवून आणले आहे का?

हेही वाचा – टेनिस बॉल कसा तयार केला जातो? फॅक्टरी व्हिडीओ दाखवली संपूर्ण प्रक्रिया, एकदा नक्की बघा!

“त्याचा मित्र पाण्यात त्याची वाट पाहत आहे,” असे एकाने कमेंटमध्ये लिहिले. “तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की ते घडवून आणलेले नाही, कासवाच्या सभोवतालची सर्व वाळू पाण्याने वाहून गेल्यासारखी गुळगुळीत आहे, पायाचे ठसे नाहीत, कासवाला गाडण्याची चिन्हे नाहीत, काहीही नाही, … तो माणूस मदतीसाठी आला आहे,” असे दुसऱ्याने लिहिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men rescue turtle stuck upside down on remote beach watch snk
Show comments