सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडिओ पाहत असतो, ज्यामध्ये शूज, खुर्च्या किंवा टीव्हीच्या मागे साप लपलेले असतात. अनेकदा तर कार, स्कूटींमध्येही साप आढळल्याचे व्हायरल व्हिडिओ आपण पाहिले आहेत. सध्या अशाच एका ठिकाणी साप आढळला आहे जे पाहून तुम्ही स्कूटी किंवा बाईकवर हेल्मेट अडकवण्याचा आधी विचार करणार आहात, हो कारण गाड्यांना हेल्मेट अडकवून जाणं किती धोकादायक असू शकते, याचा अंदाज या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून लावता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये एक धोकादायक साप हेल्मेटच्या आत लपून बसला आहे. हेल्मेट परिधान करत असताना शेवटच्या क्षणी माणसाची नजर त्या सापावर पडल्यामुळे या व्यक्तीसोबत कोणती दुर्घटना घडली नाही.

हेही पाहा- Viral Video: तरुणाला अतिघाई नडली, भर वर्गातच तरुणी भिडली, व्हॅलेंटाईन डे आधीच प्रपोज केला अन्…

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ aahanslittleworld नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात हेल्मेट आणि दुसऱ्या हातात चिमटा घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. चिमट्याने ही व्यक्ती हेल्मेटच्या आत अडकलेला साप काढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक प्रयत्नांनंतर अखेर तो व्यक्ती हेल्मेटच्या आतून एक साप बाहेर काढतो. जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हेही पाहा- आईच्या पदरी गरीबीच्या झळा, बापाला रुग्णालयात नेण्यासाठी चिमुकल्यानं ३ किमीपर्यंत ढकलली हातगाडी, Video व्हायरल

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘भाग्यवान आहेस म्हणून हेल्मेट घालण्याआधी साप पाहिला’ तर आणखी एकाने लिहिलं आहे की, ‘आता हेल्मेट घालण्यापूर्वीचा हा व्हिडिओ नेहमी लक्षात राहील.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men started putting on his helmet and suddenly a snake was found inside shocking video viral jap